कर्तव्यनिष्ठ शिक्षणप्रसारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:10 AM2021-05-07T04:10:19+5:302021-05-07T04:10:19+5:30
विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापक म्हणून त्यांनी लौकिक कमावला. दरम्यान, काही वर्षांनंतर भारताची फाळणी होऊन पाकिस्तान स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आले. त्याच ...
विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापक म्हणून त्यांनी लौकिक कमावला. दरम्यान, काही वर्षांनंतर भारताची फाळणी होऊन पाकिस्तान स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आले. त्याच काळात कराचीत दंगल उसळली. हिंदू कुटुंबे भारतात परतू लागले. भारतात परतणाऱ्या अनेकांनी देशपांडे गुरुजींनाही बरोबर येण्याची विनंती केली, पण त्यांनी ती मान्य केली नाही.
गुरुजींचे घर शाळेशेजारीच होते. काही स्थानिक दंगलखोरांना ते घरात असल्याची चाहूल लागली. पंधरा वीस जणांची टोळी त्यांच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत होती. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या युसूफ शेखच्या कुटुंबाला गुरुजींबद्दल मोठा आदर होता. हल्ल्याची कुणकुण लागताच युसूफ त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला, "गुरुजी, परिस्थिती बिकट आहे. तुम्ही खोलीबाहेर येऊ नका. मी तुम्हाला मुंबईला जाणाऱ्या बोटीचं तिकीट आणून देतो. बोटीपर्यंत सुखरूप पोहोचविण्याची जबाबदारीही माझी."
जाज्वल्य कर्तव्यबुद्धी असलेले देशपांडे गुरुजी त्याला म्हणाले, “मी शाळेचा मुख्याध्यापक आहे. माझ्या जागेवर स्थानिक मुख्याध्यापक येत नाहीत, तोपर्यंत मला कराची शहर सोडता येणार नाही. माझं काय होईल याची मला पर्वा नाही. तूही माझी काळजी करू नकोस."
आपल्या कर्तव्याप्रती प्रसंगी स्वतःच्या जिवाचीही पर्वा न करणाऱ्या जनार्दन देशपांडे यांच्यासारखा ध्येयवादी कर्तव्यनिष्ठ शिक्षक विरळाच, नाही का!
- प्रसाद भडसावळे