ओझरच्या विघ्नेश्वराची विधिवत पूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:13 AM2021-09-11T04:13:12+5:302021-09-11T04:13:12+5:30

त्याआधी पहाटे पाचला ब्राम्हणवृंद हेरंब, जयेश व विघ्नराजेंद्र जोशी यांनी श्रींची यथासांग विधिवत महापूजा व महाआरती केल्यानंतर श्रींची ...

Dutiful worship of Vighneshwar of Ojhar | ओझरच्या विघ्नेश्वराची विधिवत पूजा

ओझरच्या विघ्नेश्वराची विधिवत पूजा

Next

त्याआधी पहाटे पाचला ब्राम्हणवृंद हेरंब, जयेश व विघ्नराजेंद्र जोशी यांनी श्रींची यथासांग विधिवत महापूजा व महाआरती केल्यानंतर श्रींची पालखी चौथ्या द्वारयात्रेसाठी ओझर येथे जगदाळे मळ्यातीळ (आंबेराई) अंबिका मंदिरकडे प्रस्थान झाले. त्या ठिकाणी पृथ्वी सूर्य पूजा करण्यात आली. श्रींच्या पालखीचे मंदिरात ११.५५ मिनिटांनी आगमन झाले. धार्मिक विधी झाल्यावर दुपारी साडेबारा वाजता श्रींचा जन्मोत्सव सोहळा करण्यात आला. यात्रेचे नियोजन उपाध्यक्ष अजित कवडे, सचिव दशरथ मांडे, खजिनदार कैलास घेगडे, विश्वस्त बी.व्ही.मांडे, उद्योजक मंगेश मांडे, रंगनाथ रवळे, किशोर भास्कर, कवडे, कैलास मांडे, आनंदराव मांडे, गणपत कवडे, उद्योजक मिलिंद कवडे, विजय घेगडे, श्रीराम पंडित, राजश्री कवडे, ओझरचे सरपंच तारामती कर्डक, मथुरा कवडे, देवस्थानचे व्यवस्थापक गणेश टेंभेकर, पांडुरंग कवडे, अशोक घेगडे यांनी केले. ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या नियोजनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Web Title: Dutiful worship of Vighneshwar of Ojhar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.