ऑफ ड्युटी असतानाही अग्निशामक दलाच्या जवानाने दाखविली कर्तव्य तत्परता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 06:37 PM2019-01-30T18:37:39+5:302019-01-30T18:40:04+5:30

लोहगाव येथे बुधवारी सकाळी नऊ वाजता राठोड निवास याठिकाणी घरगुती सिलेंडरने मोठ्या प्रमाणात पेट घेतला असल्याची घटना घडली.

off duty soldiers doing fire control | ऑफ ड्युटी असतानाही अग्निशामक दलाच्या जवानाने दाखविली कर्तव्य तत्परता

ऑफ ड्युटी असतानाही अग्निशामक दलाच्या जवानाने दाखविली कर्तव्य तत्परता

Next
ठळक मुद्देकेवळ पाचच मिनिटात आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला

पुणे : लोहगाव येथे बुधवारी सकाळी नऊ वाजता राठोड निवास याठिकाणी घरगुती सिलेंडरने मोठ्या प्रमाणात पेट घेतला असल्याची घटना घडली. या घटनेत मदतीची मागणी करणारा फोन अग्निशामक दलाच्या नियंत्रण कक्षात खणाणला. या घटनेची गंभीरता ओळखून दोन अग्निशामक गाड्या रवाना करण्यात आल्या. मात्र, घटनास्थळापासून जवळच राहत असल्याने अग्निशामक दलात कार्यरत असलेल्या तांडेल राजाराम केदारी यांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्यावेळी  ड्युटी दुपारची असल्याने घरीच असलेले जवान केदारी घटना समजताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेथे पोहोचताच त्यांना घरगुती सिलेंडर स्वयंपाक खोलीत आगीच्या ज्वाळांमध्येच दिसला. घरातील लोकांनी भीतीने सिलेंडर शेगडीसकट घराबाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. आगीने रौद्र रुप धारण केलेल्या सिलेंडरवर काही ब्लँकेट, चादर ही टाकले. पण काही उपयोग झाला नाही. जवान केदारी यांनी शिताफीने एका लोखंडी पट्टीने प्रथम पेटत्या सिलेंडरवरचे चादर काढून त्या सिलेंडरवर ओल्या कपड्याने एकच झपका देत आग कमी करत सिलेंडर रेग्युलटर पासून वेगळा करत बाहेर अंगणात आणला. जवान केदारी यांनी दाखविलेले कौशल्य व केवळ पाचच मिनिटात आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला. सुदैवाने मोठी हानी टळली. आग विझताच तिथे अग्निशमन अधिकारी रमेश गांगड व दलाचे जवान ही पोहोचले. परंतू, तांडेल राजाराम केदारी यांनी बजाविलेल्या कामगिरीचे त्यांनी कौतुकच केले. तसेच राठोड निवासमधील रहिवाशांनी त्यांचे आभार मानले.  

Web Title: off duty soldiers doing fire control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.