अस्वच्छता करणा:या 75 जणांवर खटले
By admin | Published: December 9, 2014 12:13 AM2014-12-09T00:13:20+5:302014-12-09T00:13:20+5:30
वारंवार सूचना देऊनही शहरातील नागरिक, तसेच व्यावसायिक आस्थापनांकडून सार्वजनिक ठिकाणी कचरा, घाणपाणी सोडणो, तसेच परिसर अस्वच्छ करण्याचे प्रकार सुरूच आहेत.
Next
पुणो : वारंवार सूचना देऊनही शहरातील नागरिक, तसेच व्यावसायिक आस्थापनांकडून सार्वजनिक ठिकाणी कचरा, घाणपाणी सोडणो, तसेच परिसर अस्वच्छ करण्याचे प्रकार सुरूच आहेत. अशा घाण करणा:या तब्बल 75 जणांवर पालिकेच्या घोले रस्ता आणि औंध क्षेत्रीय कार्यालयाकडून गेल्या दोन दिवसांत तब्बल 75 नागरिकांवर खटले दाखल करण्यात आलेले आहेत. मात्र, या दोन क्षेत्रीय कार्यालयांकडून शहरात ही कारवाई सुरू असताना, इतर क्षेत्रीय कार्यालयांकडून मात्र या कारवाईकडे दुर्लक्ष केले जात आहे.
शहरातील कचरासमस्या दिवसें दिवस वाढतच असून, अनेक उपद्रवी नागरिकांकडून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला जात आहे. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण तर होत आहेच, शिवाय त्याचा त्रस आसपासच्या नागरिकांना होत आहे. त्यामुळे अशा नागरिकांना शिस्त लावण्यासाठी मागील आठवडय़ात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी सर्व क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी, तसेच आरोग्य निरीक्षकांची बैठक घेऊन सार्वजनिक ठिकाणी कचरा करणा:या नागरिकांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, मागील आठवडय़ात शुक्रवारी, शनिवारी, तसेच सोमवारी औंध क्षेत्रीय कार्यालयाने 4क् जणांवर, तर घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडून 35 जणांवर खटले दाखल करण्यात आल्याची माहिती क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली. तसेच, या पुढेही ही कारवाई अधिक तीव्रपणो करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यात घराच्या परिसरात कचरा करणारे नागरिक, रस्त्यावर पाणी सोडणारे हॉटेल व्यावसायिक, कचरा टाकणारे व्यावसायिक यांचा समावेश असल्याचे डॉ. देवकर म्हणाले. (प्रतिनिधी)
इतर क्षेत्रीय कार्यालये मात्र उदासीन
4घनकचरा व्यवस्थापन विभागाने ही कारवाई करण्याच्या सूचना सर्वच क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आल्या होत्या. शहरात सुमारे 15 क्षेत्रीय कार्यालये आहेत. त्यातील केवळ 2 कार्यालयांनीच ही कारवाई सुरू केली आहे. तर इतर क्षेत्रीय कार्यालये उदासीन असल्याचे चित्र आहे. तर, मनुष्यबळ नसल्याचे कारण पुढे करीत अनेक क्षेत्रीय वैद्यकीय अधिका:यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.