सिंहगडावर जाणारी ई बस कठड्याला धडकली; सातशेहून अधिक मीटर दरीपासून बचावले नागरिक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 06:43 PM2022-05-13T18:43:00+5:302022-05-13T18:43:11+5:30

महाराष्ट्र दिनाच्या दिवशी पुण्यात सिंहगडावर ई बस सेवेचा प्रारंभ करण्यात आला आहे

E bus carrying passengers hit a wall at Sinhagad Citizens rescued from the valley more than seven hundred meters | सिंहगडावर जाणारी ई बस कठड्याला धडकली; सातशेहून अधिक मीटर दरीपासून बचावले नागरिक

सिंहगडावर जाणारी ई बस कठड्याला धडकली; सातशेहून अधिक मीटर दरीपासून बचावले नागरिक

Next

पुणे/धायरी : महाराष्ट्र दिनाच्या दिवशी पुण्यात सिंहगडावर ई बस सेवेचा प्रारंभ करण्यात आला. आणि ई बस सेवेचे शुल्क प्रति मानसी जाण्यासाठी 50 आणि येण्यासाठी 50 असे शंभर रुपये करण्यात आले आहे. तर वाहन तळ शुल्क दोन चाकीसाठी दहा रुपये आणि चार चाकीसाठी वीस रूपये असे करण्यात आले आहे. त्यानंतर पुणेकरांनी आनंदाने प्रवास करण्यास सुरुवात केली आहे. तसेच सिंहगडावर गर्दीही वाढू लागली होती. त्यातच आज सिंहगड पायथ्यापासून वर गडापर्यंत जाण्याचा रस्त्यात धक्कादायक घटना घडली आहे. 

 तीव्र उतारावरील वळणावरून चालकाचे नियंत्रण सुटल्याने ई बस कठड्याला जोरदार धडकली. सुदैवाने बस कठड्याला अडकल्याने बसमधील प्रवासी बचावले आहेत. हा अपघात शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास सिंहगडावरून बस खाली येताना घडला. सिंहगडावरून खाली कठड्याला लागून साधारण सातशेहून मिटरचे दरी आहे. बस मध्ये पस्तीस ते चाळीस प्रवासी प्रवास करत होते. आज दुपारी साडेबाराच्या दरम्यान ही घटना घडली.
 
शुक्रवारी दुपारी सिंहगडावर गेलेल्या ई बस पैकी एक बस परत सिंहगडावरून खाली येताना पहिल्याच तीव्र उतारावरील वळणावर वळताना चालकांचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कठड्याला धडकली. सुदैवाने कठड्याला बस अडकल्याने सर्व प्रवासी बचावले. यावेळी बसमधून पस्तीस ते चाळीस प्रवासी प्रवास करत होते. 

बस धडकली त्या कठड्याला लागून साधारण सातशेहून अधिक मीटरची दरी

ज्या कठड्याला बस धडकली त्या कठड्याला लागून साधारण सातशेहून अधिक मीटरची दरी आहे. गडावरून खाली उतरताना पहिले वळण तीव्र उताराचे आहे, तेथे वळताना बसला डावीकडे मागे- पुढे बस घेऊन चालवावी लागते.  सिंहगडावरील वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करण्याच्या अनुषंगाने “माझा सिंहगड, माझा अभिमान' या मोहिमेंतर्गत वन विभाग आणि पीएमपीएमएलच्या वतीने सिंहगडावर जाण्यासाठी 1 मेपासून बससेवा सुरू केली. या सेवेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र पर्यटकांच्या संख्येच्या तुलनेत बसेसची संख्या कमी असल्याने बस मध्ये क्षमेतपेक्षा जास्त प्रवासी बसत असल्याने काही वेळा चढाला बस वर जात नाही.

Web Title: E bus carrying passengers hit a wall at Sinhagad Citizens rescued from the valley more than seven hundred meters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.