Pune: महाविद्यालय आणि शिक्षण संस्थांच्या परिसरात ई-सिगारेटला बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 12:24 PM2023-07-29T12:24:11+5:302023-07-29T12:24:51+5:30
ई-सिगरेटची विक्री आणि उपयाेग हाेणार नाही, यासाठी तपासणी मोहीम राबवण्याची सूचनाही विद्यापीठाने केली आहे....
पुणे : महाविद्यालय आणि शिक्षण संस्थांच्या परिसरात ई-सिगारेटला बंदी घालण्याचे निर्देश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने देण्यात आले आहेत. तसेच ई-सिगरेटची विक्री आणि उपयाेग हाेणार नाही, यासाठी तपासणी मोहीम राबवण्याची सूचनाही विद्यापीठाने केली आहे.
केंद्र सरकारकडून ई-सिगारेटचे उत्पादन, साठवणूक, विक्री आणि वापरावर इलेक्ट्रॉनिक सिगारेटस् प्रतिबंध अधिनियम, २०१९ नुसार बंदी घालण्यात आली आहे. विद्यार्थी व्यसनाधीनतेकडे वळू नयेत, यासाठी ई-सिगारेटचा वापर रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश उच्च शिक्षण संचालनालयाने विद्यापीठे, महाविद्यालयांना निर्देश दिले आहेत.
त्यानुसार महाविद्यालये आणि शिक्षण संस्थांच्या परिसरात ई-सिगारेटची विक्री तसेच उपयोग होणार नाही, या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचनांचे परिपत्रक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी प्रसिद्ध केले आहे.