पुणे : हिंजवडीत ई-मेल हॅक करून तरूणाला घातला 72 हजार रुपयांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 04:34 PM2018-04-14T16:34:08+5:302018-04-14T19:19:19+5:30
संतोषकुमार हिंजवडी आयटी-पार्कमधील एका कंपनीत नोकरीला आहेत. आरोपींनी त्याचा ई-मेल आयडी हॅक करुन त्याच्याबँक खात्यातून ७२ हजार ७०६ रुपये परस्पर काढून घेऊन फसवणूक केली.
पिंपरी : हिंजवडी आयटी पार्कमधील कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणाचा ई-मेल आयडी हॅक करुन त्याला ७२ हजार ७०६ रूपयांना उत्तर प्रदेशातील एका टोळीने गंडा घातला आहे. हा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. या प्रकरणी महमद नजिम, गोपाल दास आणि महमद असमल (सर्व रा. उत्तरप्रदेश) या तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरोधात संतोषकुमार प्रकाशराव ब्रह्मराऊत (३२, रा. नेरे दत्तवाडी, मुळशी) यांनी फिर्याद दिली आहे. संतोषकुमार हिंजवडी आयटी-पार्कमधील एका कंपनीत नोकरीला आहेत. आरोपींनी त्याचा ई-मेल आयडी हॅक करुन त्याच्याबँक खात्यातून ७२ हजार ७०६ रुपये परस्पर काढून घेऊन फसवणूक केली. हिंजवडी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.