हवेली तालुक्यात ई-फेरफार व सातबारा दुरुस्ती शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:08 AM2021-06-28T04:08:41+5:302021-06-28T04:08:41+5:30

जिल्हाधिकारी कार्यालय (कुळकायदा शाखा) यांचे लेखी पत्रान्वये हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील,अपर तहसीलदार विजयकुमार चौबे, महसूल नायब तहसीलदार संजय ...

E-modification and Satbara repair camp in Haveli taluka | हवेली तालुक्यात ई-फेरफार व सातबारा दुरुस्ती शिबिर

हवेली तालुक्यात ई-फेरफार व सातबारा दुरुस्ती शिबिर

Next

जिल्हाधिकारी कार्यालय (कुळकायदा शाखा) यांचे लेखी पत्रान्वये हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील,अपर तहसीलदार विजयकुमार चौबे, महसूल नायब तहसीलदार संजय भोसले, निवासी नायब तहसीलदार अजय गेंगाणे यांनी याबाबत तातडीने नियोजन करून शेतकऱ्यांच्या संगणकीय सातबारातील चुका दुरुस्त करणेकामी शिबिर आयोजित करून प्रत्यक्ष कामकाजासही सुरुवात केली आहे.

हवेली तालुक्यातील वाघोली, थेऊर, उरुळी कांचन, कळस, कोथरुड, खडकवासला, हडपसर व खेड शिवापूर या आठ मंडलाधिकारी कार्यालयाच्या सर्व तलाठ्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रलंबित कामे मंडल अधिकाऱ्यांच्या मुख्य कार्यालयात दुरुस्ती शिबिर होत आहे. यामध्ये प्रामुख्याने ७/१२ मधील गुणवत्ता आधारित विविध दुरुस्त्या करणे, संगणीकृत ७ /१२ चे वाचन, नवीन फेरफार नोंदी दाखल करण्यासाठीची कार्यवाही, प्रलंबित नोंदीची निर्गती व प्रमाणित ७/१२ वितरण, विविध स्वरूपातील अहवाल दुरुस्ती करणे, अक्षरी भूमापन क्रमांक व गट क्रमांक दुरुस्त करून अहवाल सादर करणे. अहवाल १'दुरुस्त करणेकामी कार्यवाहीचा अहवाल. नोंदणीकृत नोंदी व अनोंदणीकृत नोंदीबाबत कामकाज, संगणीकृत ७/१२ व हस्तलिखित ७/१२ चे वाचन करणे इत्यादी कामे दुरुस्ती शिबिरात होणार आहेत.

तृप्ती कोलते- पाटील, तहसीलदार हवेली :- अहवाल १ दुरुस्ती, प्रलंबित नोंदीची निपटारा करणे, संगणकीय सातबारा दुरुस्ती करणे, दुरुस्ती शिबिरातील केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सर्व तलाठी व मंडलाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयात सादर करावयाचा आहे. या कामात हलगर्जीपणा व दिरंगाई खपवून घेतला जाणार नाही. शेतकऱ्यांच्या तक्रारी दुरुस्ती शिबिरात निर्गत न झाल्यास त्यांनी तहसील कार्यालयात संपर्क करण्याचे आवाहन करणेत येत आहे.

कळस (ता.हवेली) येथील मंडलाधिकारी कार्यालयात ई-फेरफार नोंदी व सातबारा दुरुस्तीचे काम करताना मंडल अधिकारी व तलाठी.

Web Title: E-modification and Satbara repair camp in Haveli taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.