स्वारगेट ते कोल्हापूर मार्गावर आजपासून ई शिवाई बसला सुरूवात

By नितीश गोवंडे | Published: August 25, 2023 01:32 PM2023-08-25T13:32:53+5:302023-08-25T13:33:17+5:30

पुणे विभागातून ४ बसेस आणि कोल्हापूर विभागातून ४ अशा ८ बसेस या मार्गावर दररोज धावणार आहेत...

E Shivai will start from today on Swargate to Kolhapur route | स्वारगेट ते कोल्हापूर मार्गावर आजपासून ई शिवाई बसला सुरूवात

स्वारगेट ते कोल्हापूर मार्गावर आजपासून ई शिवाई बसला सुरूवात

googlenewsNext

पुणे : एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वातानुकूलित आणि आरामदायी प्रवास करता यावा या उद्देशाने वेळोवेळी विविध बदल एसटी प्रशासनातर्फे केले जातात. यासोबतच प्रदुषण नियंत्रणासाठी देखील एसटी प्रशासनाकडून विविध मार्गांवर ई बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी स्वारगेट ते कोल्हापूर या मार्गावर ई शिवाई बसला सुरूवात करण्यात आली. पुणे विभागातून ४ बसेस आणि कोल्हापूर विभागातून ४ अशा ८ बसेस या मार्गावर दररोज धावणार आहेत.

याआधी पुण्यातून पुणे ते नाशिक मार्गावर १८, पुणे ते छत्रपती संभाजीनगर मार्गावर १० ई शिवाई बसेस धावत आहेत. शुक्रवारपासून यामध्ये पुणे ते कोल्हापूर मार्गावर ८ ई शिवाई धावण्यास सुरूवात झाली आहे.

पुणे ते कोल्हापूर ई शिवाई बसेसच्या वेळा...
१) स्वारगेट ते कोल्हापूर
सकाळी ०५:००, ०५:३०, ०६:३०, ०९:००, ०९:३०, १०:३०, दुपारी ०१:३०, ०२:३०, ०३:३० आणि संध्याकाळी ०७:३०

२) कोल्हापूर ते स्वारगेट
सकाळी ०५:००, ०५:३०, ०६:३०, ०९:००, ९:३०, १०:३०, दुपारी ०१:३०, ०२:३०, ०३:३० आणि संध्याकाळी ०७:३०

Web Title: E Shivai will start from today on Swargate to Kolhapur route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.