आधी दुष्काळ, आता हवामानाची अवकृपा, पावसामुळे हाती आलेली पिके जाणार वाया

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 01:18 AM2018-11-07T01:18:13+5:302018-11-07T01:18:24+5:30

ऐन दिवाळीत अवकाळी पावसामुळे द्राक्ष आणि डाळिंब उत्पादकांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून ढगाळ हवामान व पावासामुळे द्राक्षावर डाऊनी, तर डाळिंबावर तेल्या व डांबऱ्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.

Earlier, due to drought, weather condition, waste wasted due to rain | आधी दुष्काळ, आता हवामानाची अवकृपा, पावसामुळे हाती आलेली पिके जाणार वाया

आधी दुष्काळ, आता हवामानाची अवकृपा, पावसामुळे हाती आलेली पिके जाणार वाया

Next

बारामती  - ऐन दिवाळीत अवकाळी पावसामुळे द्राक्ष आणि डाळिंब उत्पादकांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून ढगाळ हवामान व पावासामुळे द्राक्षावर डाऊनी, तर डाळिंबावर तेल्या व डांबऱ्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी, फळबागांच्या उत्पादनखर्चामध्ये वाढ होणार आहे.
यंदा पावसाने ओढ दिल्याने बारामती-इंदापूर तालुक्यात दुष्काळीस्थिती निर्माण झाली आहे. बारामती-इंदापूरचा शासनाने दुष्काळी तालुक्यांमध्ये समावेश केला आहे. एकीकडे पाणीटंचाईचा सामना करीत बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर, माळेगाव, सोमेश्वरनगर, काटेवाडी, ढेकळवाडी, पिंपळी, डोर्लेवाडी, सांगवी आणि परिसरात, तर इंदापूर तालुक्यातील लासुर्णे, बोरी, काझड, शेळगाव, अंथुर्णे, कळस, वालचंदनगर, निमगाव केतकी परिसरात शेतकरी फळबागा सांभाळत आहेत. मात्र, मागील चार दिवसांपासून ढगाळ हवामानामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. दुपारी प्रचंड उकाडा, तर सायंकाळी व रात्रीच्या सुमारास पावसाचा शिडकावा त्यामुळे रोग बळावू लागले आहेत. फुलोºयात असलेल्या द्राक्ष घडांमध्ये व डाळिंबाच्या कळीमध्ये पावसाचे पाणी साठून राहते. परिणामी द्राक्षावर डाऊनी, घड कुज, करपा, भुरी आदी रोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे, तर डाळिंबावर तेल्या, डांबºया, फळ कुज आदी रोग दिसून येऊ लागले आहेत. मागील तीन महिन्यांपासून दोन्ही तालुक्यांमध्ये हुमनीने ऊसशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. एकट्या इंदापूर तालुक्यात तब्बल १८ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र हुमनीमुळे बाधित झाले. काही भागात एकरी उसाचे उत्पादन ७० ते ७५ टक्क्यांनी घटले आहे. त्यात अवकाळी पाऊस व ढगाळ हवामानामुळे फळबागांचे नुकसान होत असल्याने ऐन दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकरी संकटांनी घेरला गेला आहे.

जिल्ह्यात या वर्षी समाधानकारक पाऊस झाला असला तरी अनेक तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती आहे. खरीप हंगाम कसाबसा हातात आला. मात्र, रब्बी हंगाम बहुतांश वाया गेला आहे. काही ठिकाणी पिके हाती येणार, अशी आशा शेतकºयांना होती. मात्र, अवकाळीच्या फेºयामुळे ही पिकेही हातातून निघून घेली आहे. सर्वाधिक फटका भातउत्पादकांना बसला आहे.

द्राक्ष, डाळींब, केळी आदीसारख्या फळबागांमध्ये शेतकरी मोठ्याप्रमाणात भांडवल गुंतवत असतो. नियोजनाप्रमाणे हंगाम साधला, तर शेतकºयाला उत्पन्नाची खात्री येते.
मात्र, यंदा दुष्काळी परिस्थिती, रोगांचा वाढता प्रादुर्भाव व आता ढगाळ हवामान यामुळे उत्पादन खर्चात ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
रोगांचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास पीक हातचे सोडून द्यावे लागते, तर काही वेळेस बागाच काढून टाकाव्या लागतात. रोग आटोक्यात आणण्यासाठी दररोज सकाळ-संध्याकाळ महागड्या औषधांची फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे साहजिकच उत्पादन खर्चात वाढ होऊ लागली आहे.

चार-पाच दिवसांपासून ढगाळ हवामान आहे. डाऊन्यामुळे द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे औषधांच्या जादा फवारण्या कराव्या लागल्या. परिणामी, उत्पादन खर्चातदेखील वाढ झाली आहे. सध्या डाऊन्या आटोक्यात आला आहे.
- सतीश भोसले
द्राक्ष उत्पादक शेतकरी
लासुर्णे (ता. इंदापूर)

फळबागा पट्ट्यात औषधकंपन्यांनी बाजार मांडला आहे. ‘अमूक एका कंपनीच्या औषधाने फरक पडत नाही. आमच्या कंपनीचे औषध मारा’ अशापद्धतीने कंपनीचे सेल्समन शेतकºयांच्या बांधावर जाऊन महागडी औषधे शेतकºयांच्या माथी मारत आहेत. या कंपन्या शासनाने बंदी घातलेली कीटकनाशके, बुरशीनाशके या माध्यमातून विकत तर नाहीत ना, अशीही शंका उपस्थित केली जात आहे.

भातपीक भिजल्याने उत्पादन घटले; पंचनाम्याची मागणी


भोर : तालुक्यात गेल्या ३ दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकºयांनी खाचरात कापणी करून ठेवलेले व खळ्यावर आणून झोडणी सुरू असलेले भात पावसामुळे भिजल्याने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आधीच रोगामुळे उत्पादनात घट, त्यात पुन्हा पावसाने पिके भिजल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. या पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
भोर तालुक्याच्या पश्चिम भागात मागील १५ दिवसांपासून भातकाढणीच्या कामाला वेग आला आहे. शेतकरी कामात व्यस्त आहेत. मात्र, शनिवारी ३ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजता अचानक मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. त्यानंतर ४ व ५ नोव्हेंबरला सायंकाळी, तर ६ नोव्हेंबरला रात्री पुन्हा जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतात कापून ठरवलेले भात खाचरात पाणी तुंबल्याने पाण्यात उपवत असून खळ्यावर आणून झोडणी सुरु असलेले भात व पेंढा पावसात भिजल्याने भात व पेंढा खराब झाला आहे. अचानक सुरु झालेल्या पावसामुळे शेतकºयांची मोठी तारांबळ उडाली.

यावर्षी समाधानकारक पावसामुळे भाताचे पीक चांगले होते. मात्र, शेवटचे दोन पाऊस मिळाले नाहीत. यामुळे पिकावर करपा रोगाच्या प्रादुर्भावामुळे भाताचे पीक घटले होते. राहिलेले भात दिवाळीच्या आधी काढावे म्हणून शेतकरी भातकापणी व झोडणीच्या घाईत होते. मात्र मागील ३ दिवसांपासून सतत पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे भाताचे आगार असलेले भोर तालुक्यातील पीक मोठ्या प्रमाणात खराब झाले आहे.

Web Title: Earlier, due to drought, weather condition, waste wasted due to rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे