आधी आईला केले कोरोनामुक्त अन् स्वत:ही झाला ठणठणीत बरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:11 AM2021-05-09T04:11:58+5:302021-05-09T04:11:58+5:30

मनोहर बोडखे दौंड: आईचा पाठिशी हात असला तर कोणातही कठीण प्रसंग, संकटे यावर आपण मात करु शकतो. पण ...

Earlier, the mother was coronally freed and healed himself | आधी आईला केले कोरोनामुक्त अन् स्वत:ही झाला ठणठणीत बरा

आधी आईला केले कोरोनामुक्त अन् स्वत:ही झाला ठणठणीत बरा

Next

मनोहर बोडखे

दौंड: आईचा पाठिशी हात असला तर कोणातही कठीण प्रसंग, संकटे यावर आपण मात करु शकतो. पण ज्यावेळी आईच संकटात असेल तर मन अगदी हेलावून जात. मनाची घालमेल सुरु असते. आईला संकाटातून वाचवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी मुल तयार असतात. सध्या कोरोनाचे संकट आहे. यातून डॉक्टर आईलामुक्त करुन स्वत:ही डॉक्टर मुलगा ठणठणीत बरा झाला. डॉ. संध्या खवटे आणि डॉ. रोहन खवटे अशी त्यांची नावे आहेत.

येथील खवटे रुग्णालयात काही दिवसांपूर्वी खांद्याचे हाड मोडले म्हणून एक रुग्ण दाखल झाला होता. त्याच्यावर डॉ. संध्या खवटे या उपचार करत होते. उपचारादरम्यान तो रुग्ण बेशुद्ध झाला. त्यामुळे त्यांच्या विविध चाचण्या घेण्याबरोबरच कोरोनाचाचणीही घेण्यात आली. डॉ. संध्या यांनी त्याच्यावर उपचार करत त्याला शुद्धीवर आणले. त्यानंतर त्याचे तपासणी अहवाल आले असता तो कोरोनाबाधित असल्याचे समोर आले. चार-पाच दिवसानंतर डॉ. संध्या खवटे यांना त्रास होऊ लागल्याने त्यांची कोरोना चाचणी केली असता त्याही बाधित असल्याचे आढळले.

डॉ. संध्या यांना एकच मुलगा. आईला कोरोना झाल्याचे समजताच डॉ. रोहन यांचा जीव कासावीस झाला. कारण प्रश्न होता तो आईची सेवा कोणी करायची. रुग्णालयातील एका खोलीमध्ये डॉ. संध्या यांनी स्वत:ला विलग करुन घेतले होते. रोहन यांनी मागेपुढे न पाहता आईची सेवा करण्यासाठी स्वत:ही विलग झाला. सात दिवस आईची सेवा केली. यावेळी त्यांनी उत्साहवर्धक वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे आईला तणावातून दूर कसे ठेवला येईल याचा त्यांनी जास्तीत प्रयत्न केला आणि रोहन यांचे हे प्रयत्न यशस्वी झाले. डॉ. संध्या खवटे या कोरोनामुक्त झाला. पण, रोहन मात्र, बाधित झाले. त्यांनीही न डगमगता कोरोनावर मात केली. आई आणि मुलाचे वात्सल्य सध्याच्या जमान्यात दुर्मीळच म्हणावे लागेल.

तोच खरा आई वडिलांसाठी सार्थकी दिवस

सध्याच्या परिस्थितीत आई वडीलांची सेवा करणारी मुल दुर्मीळ होत चालली आहे. समाजातील प्रत्येक मुला मुलीने आई वडीलांची सेवा करण्याचा निर्धार घेतला तर निश्चीतच वृद्धाश्रम बंद पडतील. ज्या दिवशी वृद्धाश्रम बंद पडतील तोच खरा आई वडीलांसाठी सार्थकी दिवस असेल.आई-वडीलांची सेवा म्हणजे परमेश्वराची सेवा होय असे डॉ संध्या खवटे यांनी सांगितले.

फोटो

०८ दौंड

खवटे

Web Title: Earlier, the mother was coronally freed and healed himself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.