पूर्व पुण्यातील वीज शुक्रवारी दिवसभर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2015 12:18 AM2015-04-30T00:18:25+5:302015-04-30T00:18:25+5:30

वीजवाहिनीच्या कामासाठी मुंढवा आणि हडपसर परिसरात शुक्रवारी सकाळी सात ते सायंकाळी सातच्या दरम्यान वीजपुरवठा बंद राहणार आहे.

Eastern Pune Electricity closed on Friday | पूर्व पुण्यातील वीज शुक्रवारी दिवसभर बंद

पूर्व पुण्यातील वीज शुक्रवारी दिवसभर बंद

Next

पुणे : वीजवाहिनीच्या कामासाठी मुंढवा आणि हडपसर परिसरात शुक्रवारी सकाळी सात ते सायंकाळी सातच्या दरम्यान वीजपुरवठा बंद राहणार आहे.
ही वाहिनी सिंगल सर्कीट असल्याने अनेकदा तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित होतो. पर्यायी वीजपुरवठ्याची सोय उपलब्ध करून देता येत नाही. त्यामुळे ही वाहिनी आता डबल सर्कीटमध्ये रुपांतरीत करून ती मगरपट्टा २२०/१३२ केव्ही उपकेंद्रातून उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यासाठी मगरपट्टा उपकेंद्रात याआधीच १०० एमव्हीए क्षमतेचे दोन रोहित्र उभारण्यात आले आहे. शिर्केरोड, कुमार पॅरॅडाईज, कस्तुरी सेंटर, कीर्तनेबाग, मगरपट्टा-मुंढवा रोड, साडेसतरानळी, तुपेनगर, केशवनगर, मुंढवा गाव, कोरेगाव पार्क रोड, हडपसर रेल्वेस्थानक परिसर, बीटी कवडे रोड, भीमनगर, भारत फोर्ज कंपनी परिसर, पिंगळे वस्ती, नोबेल हॉस्पीटल, मेगासेंटर, कोरेगाव पार्क परिसर, साधु वासवानी रोड, आगरकरनगर, न्युक्लीअस मॉल, एसजीएस मॉल, क्लोव्हर सेंटर, सर्कीट हाऊस, गुरुद्वारा, एमजी रोड आदी परिसरात सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहणार आहे.
(प्रतिनिधी)

४महापारेषण कंपनीकडून फुरसुंगी उपकेंद्र ते मुंढवा उपकेंद्रांची १३२ केव्ही क्षमतेची सिंगल सर्कीटची वाहिनी (टॉवर लाईन) आता मगरपट्टा उपकेंद्रातून डबल सर्कीटमध्ये रुपांतरीत करण्यात ही डबल सर्कीट वाहिनी टाकण्याचे काम शुक्रवारी (दि. १ मे) सकाळी ७ वाजता सुरू होणार असून सायंकाळी ७ वाजता ते पूर्ण होणार आहे.

Web Title: Eastern Pune Electricity closed on Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.