भोर्डी तलावाचा मार्ग सुकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:09 AM2021-04-06T04:09:27+5:302021-04-06T04:09:27+5:30

-- मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील भोर्डी तलावासाठी संपादित केलेल्या शेतकऱ्यांना ५० टक्के परतावा मिळणार, या एका अटीवर भोर्डी तलावाच्या ...

Easy access to Bhordi Lake | भोर्डी तलावाचा मार्ग सुकर

भोर्डी तलावाचा मार्ग सुकर

Next

--

मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील भोर्डी तलावासाठी संपादित केलेल्या शेतकऱ्यांना ५० टक्के परतावा मिळणार, या एका अटीवर भोर्डी तलावाच्या कामास सुरुवात करण्याच्या सूचना आमदार संग्राम थोपटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

वेल्हे तालुक्यातील भोर्डी येथे जलसंधारण विभाग येरवडा पुणे यांच्याकडून लघू पाटंबधारे तलाव २००८ मध्ये मंजूर झाला असून, शेतकऱ्यांनी या तलावास विरोध केल्याने तसेच वनविभाग आणि भूसंपादन आदीमुळे तलावाचे काम रखडले होते. आमदार संग्राम थोपटे यांच्या सातत्याने पाठपुराव्य़ाने तलावास हिरवा कंदील मिळाला. भूसंपादनासाठी शेतकऱ्यांनी विरोध केल्याने आमदार संग्राम थोपटे यांनी संबंधित अधिकारी व संपादित शेतकरी

यांची एकत्रित बैठक वेल्हे पंचायत समिती सभागृहात घेण्यात आली. त्या वेळी काही अटींवर तलावाचे काम सुरु करण्याचा निर्णय झाला. यावेळी सभापती दिनकर सरपाले, जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे, दिनकर धरपाळे, जलसंधारण विभागाचे उपविभागीय अधिकारी बी.एम.कसबे, जलसंधारण अधिकारी एम. आर. राजे, कॅाग्रेसचे तालुका अध्यक्ष नाना राऊत, माजी सभापती सीमा राऊत, मार्गासनीचे माजी सरपंच विशाल वालगुडे, शिवाजी चोरघे, केळदचे सरपंच रमेश शिंदे आदीसह भोर्डी ग्रामस्थ उपस्थित होते.

या बैठकीत संपादित केलेल्या शेतकऱ्यांना सुरुवातीला ५० टक्के परतावा द्यावा, तलावाच्या ठिकाणी रस्ते करावेत, अशा अटीवर तलावाच्या कामास सुरुवात करण्याच्या सुचना आमदार संग्राम

थोपटे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. येथील तलावाची पाणीसाठा क्षमता ७४.०० दक्ष लक्ष घनफूट असून या तलावामध्ये २५० हेक्टर ओलिताखाली येणार आहे. बंद पाईपलाईनद्वारे वितरण केल्यास अजून ५० ते १०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून भोर्डी, केळद, पिशवी आदी परिसरातील

गावातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. तर शेतकऱ्यांना ४.४६ कोटी रुपये परतावा म्हणून दिले जाणार आहे.

--

कोट

भोर्डी येथील तलावासाठी संपादित केलेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या २०१३ च्या कायद्यानुसार पाचपट परतावा मिळणार असून, येथील तलावामुळे अठरा गाव मावळ परिसरात पिण्याच्या पाणी व शेतीसाठी पाणी बारा महिने मिळणार आहे.या तलावाचे काम लवकरात लवकर व्हावे

यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे.

--संग्राम थोपटे आमदार, भोर, वेल्हे, मुळशी

Web Title: Easy access to Bhordi Lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.