रस्त्याला लागले बेकायदा पार्किंगचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 02:21 AM2018-08-31T02:21:03+5:302018-08-31T02:21:28+5:30

भारती विद्यापीठ : ऋषीकेश सोसायटीचा सेवा रस्ता

Eclipse of illegal parking took place on the road | रस्त्याला लागले बेकायदा पार्किंगचे ग्रहण

रस्त्याला लागले बेकायदा पार्किंगचे ग्रहण

Next

धनकवडी : सातारा रस्ता बीआरटी मार्गावरील भारती विद्यापीठ भुयारी मार्ग परिसर अनेक समस्यांनी ग्रासलेला असतानाच ऋषीकेश सोसायटीकडे जाताना सेवा रस्त्यावर होणाऱ्या बेकायदा पार्किंगमुळे धोकादायक ठरत आहे. नो पार्किंगचा नियम तोडून बेकायदा पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

पंधरा वर्षांपूर्वी भारती विद्यापीठात जाण्यासाठी भुयारी मार्गाची निर्मिती झाली. बीआरटी प्रकल्प आणि आत्ता अर्बन डिझाईन हा पुनर्विकास होताना या भुयारी मार्ग परिसरात कोणताच बदल अथवा विकास होणे जागेअभावी अशक्य झाले आहे. दरम्यान भुयारी मार्गालगतचे सेवा रस्ते धोकादायक ठरत आहेत. कात्रज डेअरी ते भारती विद्यापीठ भुयारी मार्गापर्यंतचा सेवा रस्ता पुरेसा असूनही वाढत्या वापरामुळे कोंडी होऊ लागली आहे. त्यातच ठिकठिकाणी होणारे पार्किंग अडथळे ठरत आहेत. त्याच वेळी कात्रजच्या दिशेने जाणारी वाहतूक भुयारी मार्ग परिसरात अपघाती ठरत आहे. ऋषीकेश सोसायटीतून लेक टाऊन ते बिबवेवाडीच्या अप्पर मार्गे कोंढव्याला जाणारा मार्ग मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे. ऋषीकेश सोसायटीत प्रवेश करतानाच बीआरटीच्या सेवा रस्ता बेकायदा पार्किंगमुळे कोंडला जात आहे. केवळ एकच वाहन जाण्याएवढा सेवा रस्ता शिल्लक राहत असल्यामुळे वाहतूककोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. बहुमजली सोसायट्यांमध्ये राहणाºया हजारो नागरिकांसाठी हे अडचणीचे ठरत आहे. सेवा रस्त्यालगतच्या इमारतीतील दुकानात येणारे वाहने अस्ताव्यस्त उभी करत आहेत. बसथांब्यालगतचा परिसर असल्यामुळे वाहनतळावर दुचाकी पार्क करण्याऐवजी सेवा रस्त्याच्या कडेला पार्क करून बसप्रवास करणाºयांची संख्या वाढली आहे.

सातत्यपूर्ण पोलीस कारवाईची गरज
सातारा रस्ता बीआरटी मार्ग भारती विद्यापीठासमोर आल्यानंतर सेवा रस्ता चालू होतो. या रस्त्यावरून ऋषीकेश सोसायटी, नॅन्सी लेक होम, लेक टाऊन, पद्मालय सोसायटी, महालक्ष्मी सोसायटी तसेच बिबवेवाडीकडे जाणारी मोठी वाहतूक या मार्गाचा वापर करीत आहे. ऋषीकेश सोसायटीसमोर असणाºया खासगी व्यवसायिकांच्या दुकानात येणाºया ग्राहकांच्या गाड्या या अरुंद रस्त्यावर बेकायदा पार्क केल्याने होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांनी सातत्याने कारवाई करण्याची गरज असल्याचे नॅन्सी लेक टाऊन सोसायटीचे चेअरमन सतीश रेणुसे यांनी सांगितले.

Web Title: Eclipse of illegal parking took place on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.