रस्त्यांना अतिक्रमणाचे ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:26 AM2020-12-13T04:26:52+5:302020-12-13T04:26:52+5:30
बारामतीतील चित्र: नगरपालिकेची कारवाईबाबत उदासीनता (अमोल यादव) बारामती: शहरातील मुख्य रस्त्यांवर चुकीच्या पध्दतीने लावल्या जाणाऱ्या काही हातगाडे, व्यावसायिकांच्या मनमानीमुळे ...
बारामतीतील चित्र: नगरपालिकेची कारवाईबाबत उदासीनता
(अमोल यादव)
बारामती: शहरातील मुख्य रस्त्यांवर चुकीच्या पध्दतीने लावल्या जाणाऱ्या काही हातगाडे, व्यावसायिकांच्या मनमानीमुळे अतिक्रमणाचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. दिवसेंदिवस ही मनमानी वाढत असल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत. कोणालाही न जुमानता भर रस्त्यावर दुकान थाटणाऱ्यांना आवरणार तरी कोण, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
लोकमतने केलेल्या पाहणीत नगर पालिकेच्या व्यापारी संकुलाच्या समोर ही दुकाने लावल्याने व्यावसायिकांना याचा मोठा मनस्ताप होत आहे. बाजार पेठेतील व्यावसायिकांकडे सुमारे तीन हजार कामगार येतात त्यांच्या दुचाकी सकाळी नऊ वाजता रस्त्यावर लागल्यावर त्या संध्याकाळी सुट्टी झाल्यावरच काढतात .मात्र बाहेरून येणाऱ्या ग्राहकला गाडी पार्किंग करण्यास जागा मिळत नाही. अस्ताव्यस्त वाहन लावून गेल्यावर वाहतुकीस अडथळा होऊन वाहतुकीचा बोजवारा उडाल्याचे चित्र सातत्याने पाहायला मिळत आहे.
शहरातील अद्यावत श्री गणेश भाजी मंडई उभारली आहे.तेथील पार्किंग अद्याप सुरू नसल्याने वाहने रस्त्यावर उभी केली जातात. तर येथील फळविक्रेते व भाजीपाला व्यावसायिक रस्त्यावर हातगाड्या लावल्याने सतत गर्दी होते आहे.आम्ही पालिकेला भाडे भरतो .मात्र ,आमच्या अडचणी पालिका समजून घेत नसल्याचे काही व्यापाऱ्यांनी सांगितले. भिगवण चौकातील लागत तीन हत्ती चौकात दिवसभर वाहने उभी असतात.हे चित्र भिगवण चौक,सिनेमा रोड, इंदापुर चौक, गणेश भाजी मंडई,गुणवडी चौक,मारवाड पेठे,कचेरी रस्त्यावर पहावयास मिळते.चार चाकी वाहनांना पेठेत परवानगी नसताना ते गाडी दामटतात त्यामुळे रस्ता बंद होऊन जातो.
पालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाची कारवाई लुटुपुटु ठरते. नंतर परत तिकडे कोणी फिरकत नाही ,परिस्थिती ‘जैसे थे’ होते.अनेक वेळा स्थानिक पदाधिकारी,काही नगरसेवक शिफारस करून कारवाई करण्यास मज्जाव करतात. त्यामुळे अधिकारी हतबल होत असल्याचे काही कर्मचाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
.................................
शहरात अनेक इमारत बांधकामाच्या परवानगीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली जाते .नंतर इमारत पूर्णत्वाचा दाखला घेऊन खाली दाखवलेल्या पार्किंगला शटर लावुन व्यावसायिक गाळे सुरू केले जातात .मात्र, आज पर्यंत यावर पालिकेकडुन कोणतीही कारवाई झालेली नाही .याबाबत नागरीकांत नेहमी चर्चा होते.
..........................................
शहरातील अस्ताव्यस्त व नियमबाह्य पार्किंग केलेल्या वाहनांवर आम्ही दंडात्मक कारवाई करत आहोत. तसेच पालिकेचे नगराध्यक्ष व मुखधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे अतिक्रमण कारवाईच्या वेळी आम्ही त्यांना पोलीस संरक्षण देत आहोत.हातगाडीवर कारवाई करण्याचे अधिकार पालिकेकडे आहे.आम्ही सतत रस्त्यावर असून येणाºया काळात कडक कारवाई करणार आहे.
धन्यकुमार गोडसे ,वाहतूक पोलीस निरीक्षक
------------——————————————
फोटोओळी - बारामती शहरात सिनेमा रस्त्यावर मनमानी पध्दतीने लावलेल्या हातगाड्या.
०१२१२२०२०बारामती—२०
—————————————
फोटोओळी -बारामती गुणवडी चौकात रस्त्यावर लावलेल्या फळविक्रेते व कापडाच्या हातगाड्या.
१२१२२०२०बारामती—२१
———————————
बारामती मारवाड पेठेत सातत्याने होणारी वाहतूककोंडी.
१२१२२०२०बारामती—२२
———————————
पानगल्ली येथील रस्त्यावर असणाऱ्या हातगाड्या.
१२१२२०२०बारामती—२३