पर्यावरणपूरक गणपती बाप्पा व गौरी सजावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:10 AM2021-09-13T04:10:36+5:302021-09-13T04:10:36+5:30
इंदापूर नगरपरिषदेकडून आयोजन : माझी वसुंधरा व स्वच्छता अभियानाची जनजागृती इंदापूर : इंदापूर नगरपरिषदेमार्फत माझी वसुंधरा अभियान व ...
इंदापूर नगरपरिषदेकडून आयोजन : माझी वसुंधरा व स्वच्छता अभियानाची जनजागृती
इंदापूर : इंदापूर नगरपरिषदेमार्फत माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षणअंतर्गत २०२१ या वर्षाच्या गणेशोत्सवामध्ये नगरपरिषदेने पर्यावरणपूरक घरगुती गणपती बाप्पा व गौरी सजावट पुरस्कार २०२१ स्पर्धांचे आयोजन केले असून, यामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांनी केले आहे.
या स्पर्धेत आपल्या गणेश उत्सवात पर्यावरणपूरक व नैसर्गिक साधनांचा वापर करून केलेली तसेच स्वच्छ सर्वेक्षण अथवा माझी वसुंधरा अभियानाबाबत सामाजिक संदेश देणारी असावी. तसेच, घरगुती गणराया अवार्डसाठी ऑनलाइन अथवा सोशल मीडियाद्वारे भाग घेणाऱ्या नागरिकांनी त्यांच्या सजावट थीमचा व्हिडीओ २ ते ३ मिनिटांचा तयार करून पाठवायचा आहे.
पर्यावरणपूरक घरगुती पर्यावरणपूरक गणपती बाप्पा व गौरी सजावट पुरस्कार २०२१ ही स्पर्धा केवळ नगरपरिषद हद्दीतील नागरिकांसाठी असून, गौरी सजावट स्पर्धेचे प्रथम पारितोषिक ५००० रुपये, द्वितीय व तृतीय पारितोषिक पैठणी साडी असणार आहे. तर सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा प्रथम पारितोषिक ५००० हजार रुपये, द्वितीय पारितोषिक ३००० रुपये व तृतीय पारितोषिक २००० रुपये असणार आहे, असे मुख्याधिकारी रामराजे कापरे व नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांनी सांगितले.