जीवनावश्यक वस्तूंमधील खाद्यतेल पेट्रोलपेक्षा महाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:08 AM2021-06-10T04:08:40+5:302021-06-10T04:08:40+5:30
काही दिवसांपूर्वी सोयाबीन, शेंगदाणा तेलाची एक लिटरची पिशवी १०० रुपयांना मिळत होती; परंतु त्यात बाजारभाव दुप्पट ...
काही दिवसांपूर्वी सोयाबीन, शेंगदाणा तेलाची एक लिटरची पिशवी १०० रुपयांना मिळत होती; परंतु त्यात बाजारभाव दुप्पट ९० रुपये वाढ झाली आहे. मोलमजुरी करणाऱ्या कामगारांचे स्वयंपाक घरातून तेल वापर गायब झाला आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनपूर्वी सूर्यफूल तेलाचा दर १०० ते १३० रुपये प्रतिलिटर होता. त्यात ५५ ते ६५ रुपयांची वाढ झाली असून, सध्या सूर्यफूल तेलाचे दर प्रतिलिटर मागे १६० ते १८५ रुपये झाले आहे. सर्वसामान्य आणि गरिबांकडून स्वयंपाकासाठी पामतेलाचा, हॉटेल व्यवसायाकडून पामतेलाची सर्वाधिक मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पामतेलाचा दर एक लिटरसाठी १३० ते १४५ झाला आहे. गेल्यावर्षी तो ७५ ते ८५ रुपयाच्या आसपास होता.
--
कोट १
स्वयंपाकातील तेल बाजारभाव वाढल्याने भाजीतील तेल कमी करून कसे चालेल. स्वयंपाकातील तेल हे पेट्रोलपेक्षा महाग झाले आहे. तेल महाग झाल्याने स्वयंपाकातील चव गायब झाली आहे. सरकारने गोडेतेल रेशनवर द्यावे.
- पल्लवी शिंदे गृहिणी
--
कोट -२
स्वयंपाक, हॉटेल व्यावसायिकांसाठी लागणारा १५ लिटर तेलाचा डबा तेराशे रुपये वरून २६०० रुपये झाला आहे. म्हणजे दुप्पट बाजारभावात वाढ झाली. उसाचा प्रती १ टन बाजारभाव हा २५०० रु असल्याने १ टन वजनाचे पैसे एक तेलाचा डब्बा खरेदी करण्यासाठी जात आहे .
मल्हारी पठारे, शेतकरी
.