अपहारप्रकरणी २० वर्षांनी शिक्षा

By admin | Published: March 24, 2017 04:31 AM2017-03-24T04:31:26+5:302017-03-24T04:31:26+5:30

न्यायालयात दंडाची रक्कम जमा करून घेऊन ती कोषागारात न भरता तिचा अपहार केल्याबद्दल प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी

Education after 20 years of disaster | अपहारप्रकरणी २० वर्षांनी शिक्षा

अपहारप्रकरणी २० वर्षांनी शिक्षा

Next

पुणे : न्यायालयात दंडाची रक्कम जमा करून घेऊन ती कोषागारात न भरता तिचा अपहार केल्याबद्दल प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही़ बी़ गुळवे पाटील यांनी तत्कालीन नाझरला सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़
इनायतुल्ला अब्दुल खान (वय ६१, रा़ घोरपडे पेठ) असे या नाझरचे नाव आहे़ १४ आॅगस्ट १९९७ रोजी दाखल झालेल्या या गुन्ह्याचा तब्बल १९ वर्षे ७ महिने आणि ८ दिवसांनी निकाल लागला आहे़ जिल्हा न्यायालयातील सहायक अधीक्षक रत्नाकर कुलकर्णी यांनी १४ आॅगस्ट १९९७ रोजी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती़ कुलकर्णी व एस़ एस़ संगमवार यांनी १५ आॅक्टोबर १९९४ ते ८ आॅक्टोबर १९९६ या कालावधीतील हिशोबाची तपासणी केली़ गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र नागणे यांनी केला़ या खटल्यात सहायक सरकारी वकील उज्ज्वला स़ पवार यांनी ४ साक्षीदार तपासले़ सरकारी पक्षाने सादर केलेला पुरावा ग्राह्य धरून खान यांना सरकारी कर्मचाऱ्याने अपहार केल्याबद्दल २ वर्षे सक्तमजुरी, २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़

Web Title: Education after 20 years of disaster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.