मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल शिक्षा
By admin | Published: January 11, 2017 03:25 AM2017-01-11T03:25:48+5:302017-01-11T03:25:48+5:30
भरधावपणे दुचाकी चालवून दुभाजकाला धडक देऊन झालेल्या अपघातात पाठीमागे बसलेल्या मित्राच्या मृत्यूस कारणीभूत
पुणे : भरधावपणे दुचाकी चालवून दुभाजकाला धडक देऊन झालेल्या अपघातात पाठीमागे बसलेल्या मित्राच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तरूणाला न्यायालय उठेपर्यंत आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी.टी.गोटे यांनी हा आदेश दिला आहे.
शुुभम सुधीर सोनवणे (वय १९, रा. दिघी) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. ही घटना २० फेब्रुवारी २०१४ रोजी घडली होती. या प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील ए.के.पाचरणे यांनी ४ साक्षीदार तपासले. शुभम सोनवणे, त्याचे मित्र अभिजित आणि सुरज विश्वकर्मा हे तिघे रात्री ३ च्या सुमारास दुचाकीवरून चालले होते. त्यावेळी शुभम गाडी चालवत होता. त्यावेळी दुचाकीची धडक दुभाजकाला बसून अपघात झाला. यामध्ये अभिजित जखमी झाला. तर सुरज विश्वकर्मा याचा मृत्यू झाला.