शिक्षण आयुक्त भापकरांची बदली
By Admin | Published: June 9, 2016 12:52 AM2016-06-09T00:52:45+5:302016-06-09T00:52:45+5:30
राज्याच्या शालेय शिक्षण आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांची बदली ग्रामविकास व जलसंवर्धन खात्याच्या सचिवपदी करण्यात आली
पुणे : राज्याच्या शालेय शिक्षण आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांची बदली ग्रामविकास व जलसंवर्धन खात्याच्या सचिवपदी करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून रात्री ऊशीरा त्यांच्यासह इतर काही आयएएस अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
डॉ. भापकर हे भारतीय प्रशासन सेवेतील (आयएएस) १९९७ च्या बॅचचे अधिकारी आहेत. भापकर यांनी गोखले इन्स्टीट्युट आॅफ इकॉनॉमिक्स अॅण्ड पॉलिटिक्स
द्यमधून अर्थशास्त्र विषयात एम.ए. केले. त्यानंतर पुणे विद्यापीठातून कृषी अर्थशास्त्र विषयात पी.एच.डी पदवी प्राप्त केली. त्यांनी १९९७ ते ९९ या कालावधीत पुण्यात पुनर्वसन विभागात उपायुक्त म्हणून कृष्णा खो-याचे पुनर्वसनाचे काम केले. तसेच औरंगाबाद येथे पालिका आयुक्त,परभणी, धुळे व पुणे येथे जिल्ह्या परिषदेचे मुख्य कार्यकरी अधिकारी तसेच नंदुरबार येथे जिल्हाधिकारी आणि त्यानंतर राज्याचे शिक्षण आयुक्त अशा विविध महत्त्वाच्या पदांवर सांभाळल्या.
राज्य आणि केंद्र शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवून आपल्या कार्यकालात त्यांनी जिल्हा परिषदांना प्रथम क्रमांक मिळवून दिला. शालाबाह्य मुलांचे राज्यव्यापी सर्वेक्षण, शालेय पोषण आहार, बोगस शिक्षकांच्या मान्यता रद्दचा निर्णय, स्वच्छता व हागणदारी मुक्ती विषयांमध्ये भरीव कामगिरी केली.
(प्रतिनिधी)
>माझी बदली ग्राम विकास विभागाच्या सचीव पदी झाल्याची चर्चा सुरू आहे. सोशल मिडियावर त्यासंदर्भातील एसएमएस फिरत आहेत. मात्र,अद्याप मला बदलीची आॅर्डर मिळालेली नाही. शिक्षण आयुक्त पदावरून मला अनेक चांगल्या गोष्टी करता आल्या याचे समाधान आहे.
- डॉ. पुरुषोत्तम भापकर,
शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य