शिक्षण विभागालाच नाही शाळा सुरू करण्याची चिंता ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:08 AM2021-06-11T04:08:48+5:302021-06-11T04:08:48+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षण विभागासह आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या होत्या. ...

Education department is not the only concern to start a school? | शिक्षण विभागालाच नाही शाळा सुरू करण्याची चिंता ?

शिक्षण विभागालाच नाही शाळा सुरू करण्याची चिंता ?

Next

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षण विभागासह आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या होत्या. कोरोनामुळे सध्या ऑनलाइन पद्धतीनेच विद्यार्थ्यांना शिकवले जाणार आहे. मात्र, शाळा सुरू करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे घड्याळी तास, कामाचे स्वरूप याबाबत सूचना काढणे अपेक्षित असते. त्या अद्याप न आल्याने मुख्याध्यापक व शिक्षकांमध्ये संभ्रम आहे.

शिक्षण विभागाचे अधिकारी केवळ दहावी-बारावीच्या निकाल प्रक्रियेतच अडकले आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गेल्यावर्षी शाळा व्यवस्थापन, ग्रामपंचायत तसेच शिक्षकांसाठी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. कोरोनाचे संकट यंदाही कायम आहे. शनिवारी-रविवारी प्रवासाच्या अडचणी आहेत. त्यामुळे या सूचना वेळेत मिळणे गरजेचे होते. उशिरा किंवा ऐनवेळी येणाऱ्या सूचनांमुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक या सर्वांनाच मनस्ताप होतो, असे सांगण्यात आले.

Web Title: Education department is not the only concern to start a school?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.