शिक्षण उपसंचालक कार्यालयाला टाळे
By Admin | Published: May 27, 2017 01:29 AM2017-05-27T01:29:56+5:302017-05-27T01:29:56+5:30
शुल्कवाढीसंदर्भात आलेल्या तक्रारींवर ठोस निर्णय होत नसल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शुल्कवाढीसंदर्भात आलेल्या तक्रारींवर ठोस निर्णय होत नसल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन केले. शुल्कवाढीवर तातडीने निर्णय घेण्याचे अधिकार शिक्षण उपसंचालकांना देण्याची मागणी करण्यात आली.
शुल्कवाढीसंदर्भात दोन महिन्यांपासून पालकांच्या तक्रारी, आंदोलनाची शिक्षणमंत्र्यांकडून गांभीर्याने दखल घेतली जात नाही. पालकांची कायम दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप
मनविसेचे शहराध्यक्ष
कल्पेश यादव यांनी या वेळी
केला. या वेळी अभिषेक जगताप, अभिषेक थिटे, परीक्षित शिरोळे, अभिजित यनपुरे, संतोष वरे, अभिजित ढमाले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
शासनाने केलेल्या कायद्यात तरतुदी करून शुल्कवाढ ठरवताना अथवा शुल्कवाढ रद्द करणे, लेखापरीक्षण तपासणे, नोंदवह्या आदी तपासणीचा अधिकार शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांना द्यावा, अशी मागणी आंदोलनावेळी करण्यात आली.