'शिक्षणमंत्री बदलण्याची गरज'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 07:06 AM2018-05-03T07:06:27+5:302018-05-03T07:06:27+5:30
या राज्यातील शंभर कुटुंबांतील लोकांना जवळ करून भाजपाने सत्ता मिळवली असून तेच लोक वषार्नुवर्षे सत्ता गाजवत आहेत
पुणे : या राज्यातील शंभर कुटुंबांतील लोकांना जवळ करून भाजपाने सत्ता मिळवली असून तेच लोक वषार्नुवर्षे सत्ता गाजवत आहेत, अशा शब्दांत शिवसेनेच्या उपनेत्या डॉ. नीलम गो-हे यांनी भाजपाला खडे बोल सुनावत ‘महाराष्ट्राचे शिक्षणक्षेत्र शिक्षणमंत्री किंवा सरकार बदलल्याशिवाय बदलणार नाही,’ अशा शब्दातं राज्य सरकारवर टीका केली.
पत्रकार वरुणराज भिडे मित्रमंडळातर्फे पत्रकार श्रीधर लोणी यांना गोºहे यांच्या हस्ते ‘वरुणराज भिडे स्मृती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. पत्रकार जयश्री बोकील, सुहास सरदेशमुख व महेश तिवारी यांना ‘आश्वासक पत्रकारिता पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. भाग्यश्री चौथाई व चंद्रकांत काईत या पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. मंडळाचे संस्थापक प्रा. विलास जोशी, अध्यक्ष उल्हास पवार उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख अध्यक्षस्थानी होते.
‘व्यक्ती चांगली असली तरी सुधारणा होत नाही. मांडलेले अनेक प्रश्न प्रलंबित आहेत,’ अशी टीका करून डॉ. गोºहे पुढे म्हणाल्या, की आर्थिक क्षमता असलेलेच व्यावसायिक शिक्षण घेऊ शकतात. शिक्षणक्षेत्रात दुकानदारी वाढली आहे. शिक्षण सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिक्षणावरील खर्च वाढवावा लागेल. हल्ली लोकांचे प्रश्न विधानभवनामध्ये मांडून त्याची बातमी होत नाही, तर बातमीवर आधारित प्रश्न विचारले जातात, अशी मार्मिक टिप्पणी त्यांनी केली.
विकासाकडेही पाहिले पाहिजे. केवळ सरकार नाही, तर पत्रकार आणि सामान्य माणूसही चुकत असतो, अशी भूमिका लक्ष्मीकांत देशमुख यांनी मांडली.
जीभ व लेखणी निर्भय असेल तर आपण बोलू शकतो. राजकीय सत्तेपेक्षा वैचारिक सत्ता महत्त्वाची आहे असेही ते म्हणाले. अंकुश काकडे यांनी सूत्रसंचालनकेले.