विकासासाठी शिक्षण गरजेचे : तागडे
By Admin | Published: December 24, 2016 06:34 AM2016-12-24T06:34:16+5:302016-12-24T06:34:16+5:30
अल्पसंख्याक समाजाचा विकास होण्यासाठी समाजातील प्रत्येक तरुणाने चांगल्या प्रतीचे शिक्षण घेतले पाहिजे, असे उद्गार
राजुरी : अल्पसंख्याक समाजाचा विकास होण्यासाठी समाजातील प्रत्येक तरुणाने चांगल्या प्रतीचे शिक्षण घेतले पाहिजे, असे उद्गार अल्पसंख्याक समाजाचे महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव श्याम तागडे यांनी राजुरी येथे काढले.
अल्पसंख्याक विकास विभाग महाराष्ट्र शासन मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग महाराष्ट्र शासन व संकल्प बहुउद्देशीय युवा संस्था याच्या वतीने राजुरी (ता. जुन्नर) गावात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, पंचायत समितीचे माजी सभापती दीपक औटी, तसेच जिल्हा परिषदेच्या सदस्या स्नेहल शेळके, गुलाम नबी शेख, राजुरी गावचे सरपंच ज्ञानेश्वर शेळके, गोविंद औटी, एकनाथ शिंदे, आसिफ खान, रईस चौगुले, सादिक आतार, मुबारक तांबोळी, मोबीन भाई, वल्लभ शेळके ,अतुल कांकरिया,जाकीर पटेल, सुनील मेहेर आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार सोनवणे म्हणाले, की या संस्थेने व राज्य शासनाकडून हा जो चांगला उपक्रम राबवला आहे, या मेळाव्याचा तरुणांनी फायदा करून घेतला पाहिजे.मेळाव्यात राज्यभरातून पंचवीस कंपन्या सहभागी झाल्या होत्या.(वार्ताहर)