शिक्षणाशिवाय परिवर्तन शक्य नाही - पलांडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 11:06 PM2018-08-28T23:06:05+5:302018-08-28T23:06:45+5:30
शिक्षणाशिवाय परिवर्तन शक्य नाही. शिक्षण हे विकासाचे माध्यम असून त्याच्या यशाची गुणवत्ता आणि दर्जा
रांजणगाव गणपती : शिक्षणाशिवाय परिवर्तन शक्य नाही. शिक्षण हे विकासाचे माध्यम असून त्याच्या यशाची गुणवत्ता आणि दर्जा हा शिक्षकांमध्ये दडलेला असल्याचे प्रतिपादन श्री म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांनी केले.
सरदवाडी (ता. शिरूर) येथील अभिनव विद्यालयाचे मुख्याध्यापक किशोर गायकवाड यांच्या सेवापूर्ती समारंभात ते बोलत होते. यावेळी शिरूर पंचायत समितीचे सभापती विश्वास कोहकडे, बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे, माई पलांडे, आबासाहेब गव्हाणे, सरपंच विलास कर्डिले, उपसरपंच किशोर सरोदे, दादासाहेब मगर, तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विठ्ठल शितोळे, सचिव मारुती कदम, माध्यमिक संघाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष दादासाहेब गवारे, तसेच संस्था पदाधिकारी, सत्कारमूर्ती किशोर गायकवाड यांचे कुटुंबीय उपस्थित होते. अभिनव विद्यालय व निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील विद्या विकास मंदिराच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने सेवापूर्तीनिमित्त गायकवाड यांचा सुवर्णमुद्रिका, संपूर्ण पोशाख, फेटा, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सूर्यकांत पलांडे व माई पलांडे यांच्या हस्ते सपत्निक सत्कार करण्यात आला. या वेळी पुष्पा सरोदे, शशिकांत दसगुडे, विश्वास कोहकडे, किसन जगताप, विलास कर्डिले, सुभाष चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप सरोदे यांनी केले. तर प्रास्ताविक अरुण गोरडे यांनी केले. शांताराम खामकर यांनी आभार मानले.