शिक्षणाधिकाऱ्यांची कानउघडणी

By admin | Published: February 7, 2015 11:56 PM2015-02-07T23:56:18+5:302015-02-07T23:56:18+5:30

वडगाव बुद्रुक येथील सिंहगड स्प्रिंगडेल शाळेमध्ये झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाची माहिती मिळूनही भेट न देणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांची शिक्षण संचालकांनी चांगलीच कानउघाडणी केली.

Education Officer's Oppression | शिक्षणाधिकाऱ्यांची कानउघडणी

शिक्षणाधिकाऱ्यांची कानउघडणी

Next

पुणे : वडगाव बुद्रुक येथील सिंहगड स्प्रिंगडेल शाळेमध्ये झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाची माहिती मिळूनही भेट न देणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांची शिक्षण संचालकांनी चांगलीच कानउघाडणी केली.
स्प्रिंगडेल शाळेतील क्रीडाशिक्षक किशोर मधुकर महाजन (वय ३८, वडगाव बुद्रुक) याला विद्यार्थीनींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पिडीत विद्यार्थिनीने पालकांकडे तक्रार केली. तेव्हा त्यांनी शाळेच्या व्यवस्थापनाकडे याबाबत विचारणा केली. पालकांच्या विचारणेनंतर शाळेने चौकशी समिती नेमून त्यामध्ये तथ्य असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या मुलींच्या पालकांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. शुक्रवारी रात्री ११.३0 वाजता बाललैंगिक अत्याचर कायद्याअंतर्गत कलम ३५४, बाललैंगिक अधिनियम ८ व १0 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी महाजन याला अटक केली.
राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांनी याबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, येत्या सोमवारी शिक्षणप्रमुख संबंधित शाळेला भेट देऊन कारवाईची दिशा ठरवतील, असे उत्तर एका अधिकाऱ्याने दिले. त्यावर तातडीने शाळेत जाऊन घटनेची चौकशी करा, असे आदेश दिले. वारजे व वानवडीतील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण आठवडाभरात निकाली काढण्याचे आदेश दिले. येत्या आठवडाभरात त्रिसदस्यीय समिती नेमून अंतीम कारवाईची दिशा ठरवा, असेही माने यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

क्रीडाशिक्षक महाजन याला पोलीस कोठडी
दरम्यान स्प्रिंगडेल शाळेत चौथीत शिकणाऱ्या २ विद्यार्थीनीचे लैगिंक शोषण केल्याप्रकरणी क्रीडाशिक्षक किशोर महाजन याला विशेष न्यायालयाने १० फेब्रुवारीपर्यत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. आरोपीला शनिवारी न्यायालयात हजर केले होते. आरोपीने अशा प्रकारे किती मुलींबरोबर गैरवर्तन केले.तसेच विनयभंगाचे प्रकार घडला आहे की गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला आहे. तपासासाठी पोलिस कोठडी देण्याची सरकारी वकिलांनी विनंती केली. न्यायालयाने युक्तिवाद ग्राह्य धरला.

Web Title: Education Officer's Oppression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.