मानव उत्थान, विकासात शिक्षणाने महत्त्वाचे स्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:13 AM2021-04-28T04:13:13+5:302021-04-28T04:13:13+5:30
पुणे: ‘ज्ञानम विज्ञान सहितम’ अशी शिक्षणाची व्याख्या करण्यात आली आहे. मानव उत्थानाबरोबरच त्यांच्या विकासामध्ये शिक्षणाने महत्त्वाचे स्थान घेतले आहे. ...
पुणे: ‘ज्ञानम विज्ञान सहितम’ अशी शिक्षणाची व्याख्या करण्यात आली आहे. मानव उत्थानाबरोबरच त्यांच्या विकासामध्ये शिक्षणाने महत्त्वाचे स्थान घेतले आहे. आध्यात्मिक ज्ञान हे आत्मिक उन्नतीबरोबरच क्षमा आणि दयेचे ज्ञान देते, असे मत केरळचे राज्यपाल डॉ. आरिफ मोहम्मद खान यांनी व्यक्त केले.
डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या ऑनलाइन पदवीदान समारंभात खान बोलत होते. याप्रसंगी प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. अशोक जोशी, डॉ. दिलीप चिनॉय, व्यावसायिक सल्लागार प्रा. राम चरण, डॉ. डी. वीरेंद्र हेगडे, एआयसीटीईचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. आर. नटराजन, एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष राहुल कराड, कुलगुरू डॉ. एन. टी. राव, प्र. कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, प्र कुलगुरू प्रा. डॉ. मिलिंद पांडे आणि कुलसचिव डॉ. प्रशांत दवे उपस्थित होते.
यावर्षी २ हजार ४०० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आल्या. ८० विद्यार्थ्यांना पदक बहाल करण्यात आले. एमटेकची विद्यार्थ्यींनी हर्षाला प्रमोद राणे हिला एक्जुकेटिव प्रेसिडेंट मेडल व कम्प्युटर सायन्सचे अक्षय प्रकाश चापेकर याला प्रेसिंडेट मेडलने सन्मानीत करण्यात आले.
राम चरण, डॉ. दिलीप चिनॉय, डॉ. अशोक जोशी, डॉ. विश्वनाथ कराड, राहुल कराड, डॉ. आर. नटराजन, डॉ. डी. वीरेंद्र हेगडे यांनी मनोगत व्यक्त केले. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन तर डॉ. प्रशांत दवे यांनी आभार मानले.