बडोदा संमेलनात साहित्य संमेलनात शिक्षणाचा जागर; प्रत्येक विद्यापीठ पाठवणार १० विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:02 PM2018-01-23T12:02:47+5:302018-01-23T12:05:23+5:30

बडोदा येथे होत असलेल्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये यंदा साहित्याबरोबरच शिक्षणाचाही जागर होणार आहे. संमेलनात शैैक्षणिक विषयांवरील परिसंवाद व कार्यशाळांचे आयोजन केले आहे.

education seminar in Baroda sahitya samelan; Every University will send 10 students | बडोदा संमेलनात साहित्य संमेलनात शिक्षणाचा जागर; प्रत्येक विद्यापीठ पाठवणार १० विद्यार्थी

बडोदा संमेलनात साहित्य संमेलनात शिक्षणाचा जागर; प्रत्येक विद्यापीठ पाठवणार १० विद्यार्थी

Next
ठळक मुद्दे१६ ते १८ फेब्रुवारीदरम्यान होत ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गुजरातमध्ये होत आहे आठ दशकांनंतर मराठी साहित्य संमेलन

पुणे : बडोदा येथे होत असलेल्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये यंदा साहित्याबरोबरच शिक्षणाचाही जागर होणार आहे. संमेलनात शैैक्षणिक विषयांवरील परिसंवाद व कार्यशाळांचे आयोजन केले आहे. प्रत्येक विद्यापीठाने १० विद्यार्थ्यांना संमेलनात सहभागी होण्यासाठी पाठवावे, अशा आशयाचे पत्र महाराष्ट्र आणि गुजरातमधील बहुतांश विद्यापीठांना आयोजक संस्थेकडून पाठवण्यात आले आहे.
महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या कर्मभूमीत १६ ते १८ फेब्रुवारीदरम्यान ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. मराठी वाङ्मय परिषदेचे दिलीप खोपकर म्हणाले, ‘भाषेतील शिक्षण घेतल्यानंतर रोजगाराचे साधन म्हणजे केवळ शिक्षकी पेशा असे गणित युवकांच्या मनात तयार झालेले असते. मात्र, तंत्रज्ञानाच्या युगात मराठी भाषेशी संबंधित रोजगाराच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. याबाबतची माहिती आणि अभिरुची निर्माण व्हावी, यासाठी संमेलनात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले जाणार आहे. त्यासाठी विद्यापीठांना पत्र पाठविले आहे.
गुजरातमध्ये आठ दशकांनंतर मराठी साहित्य संमेलन होत असल्याने मराठीपासून दूर होत असलेल्या लहान मुलांच्या दृष्टिकोनातून हे संमेलन महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी इंग्रजी माध्यमातील मराठी मुलांनाही येण्याचे आवाहन करण्यात आले.

Web Title: education seminar in Baroda sahitya samelan; Every University will send 10 students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.