शिक्षणा शिवाय विकास होणार नाही - आदित्य ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2017 04:54 PM2017-11-23T16:54:46+5:302017-11-23T16:55:08+5:30
चांगला समाज घडविण्यासाठी शिक्षण महत्वाचे आहे, शिक्षणा शिवाय विकास होणार नाही असे मत युवासनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी लोणावळ्यात व्यक्त केले.
लोणावळा : चांगला समाज घडविण्यासाठी शिक्षण महत्वाचे आहे, शिक्षणा शिवाय विकास होणार नाही असे मत युवासनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी लोणावळ्यात व्यक्त केले. आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून व नवनीत पब्लिकेशनच्या सहयोगाने तयार करण्यात आलेल्या www.shivsenatopscorer.com या संकेत स्थळाचे प्रात्यक्षिक व सादरीकरण आदित्य ठाकरे यांनी लोणावळ्यातील विद्यार्थ्याच्या समोर केले.
यावेळी शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार निलम गोर्हे, खासदार श्रीरंग बारणे, रायगड जिल्हाध्यक्ष आमदार मनोहर भोईर, वरुन सरनाईक, मच्छिंद्र खराडे, अॅड. वैभव थोरात, राजेश खांडभोर, शिवसेना गटनेत्या शादान चौधरी, भारत ठाकूर, युवासेना अधिकारी अनिकेत घुले, तानाजी सुर्यवंशी, नगरसेवक सुनिल इंगूळकर, माणिक मराठे, शिवदास पिल्ले, कल्पना आखाडे, सिंधु परदेशी, बाळासाहेब फाटक, विशाल हुलावळे आदी मान्यवर उपस्थित होते.
आदित्य ठाकरे म्हणाले मुलांनो अभ्यास हा शिकण्यासाठी करा केवळ मार्क मिळविण्यासाठी अभ्यास नसावा, मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. याकरिता शिवसेना टाॅप स्कोरर डाॅट काॅम वर युवासेनेने आठवी ते दहावीचा अभ्यासक्रम तयार केला असून प्रोमोकोड त्या वेब साईडवर टाकल्यानंतर मुलांना अभ्यासक्रम पाहता येणार आहे. हा अभ्यासक्रम पुस्तक, व्हिडीओ व आॅडीओ स्वरुपात तयार करण्यात आला असून कार्टनचा वापर करत अभ्यासक्रम व्हिडीओ स्वरुपात बनविण्यात आला आहे. तसेच यामध्ये रिव्हिजन टेस्ट व शब्दकोश देखिल असणार आहे. यावेळी मावळच्या दुर्गम भागातून आलेल्या आदिवासी मुलांनी आदित्य यांना स्वहाताने बनविलेली घोंगडी व काठी भेट दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मावळ तालुका संपर्क प्रमुख वैभव थोरात यांनी केले तर मावळचे युवासेना अधिकारी अनिकेत घुले यांनी आभार मानले.