अमेरिकेतील शिक्षण संस्थांना हवी भारतीय विद्यापीठांची दोस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 04:26 AM2020-11-26T04:26:45+5:302020-11-26T04:26:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आंतराष्ट्रीय विद्यापीठांना भारतीय विद्यापीठांसोबत येण्याच्या व्यापक संधी उपलब्ध होणार आहेत. या ...

Educational Institutions in America Want Friendship of Indian Universities | अमेरिकेतील शिक्षण संस्थांना हवी भारतीय विद्यापीठांची दोस्ती

अमेरिकेतील शिक्षण संस्थांना हवी भारतीय विद्यापीठांची दोस्ती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आंतराष्ट्रीय विद्यापीठांना भारतीय विद्यापीठांसोबत येण्याच्या व्यापक संधी उपलब्ध होणार आहेत. या धोरणामुळे अमेरिकेतील उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था भारतीय विद्यापीठांशी जोडले जाण्याबाबत अधिक उत्सुक आहेत. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या मुंबई दुतावासातील उच्चायुक्त डेविड जे. रान्झ यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला भेट देऊन कुलगुरुंशी चर्चा केली.

कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी नवीन शैक्षणिक धोरणामधील उल्लेखनीय बाबींची माहिती उच्चायुक्त डेविड जे. रान्झ यांना दिली. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, इंटरनॅशनल लिकेजेसच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर, भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुरेश गोसावी, तंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर, इंटरडिसिप्लिनरी स्कूल ऑफ सायन्सचे प्रमुख डॉ. अविनाश कुंभार आदी सहभागी झाले.

विद्यापीठात सुरु होणारे ‘सेंटर फॉर मॉलिक्युलर डायग्नॉस्टीक’ हे संशोधन केंद्र आणि विद्यापीठातर्फे संसर्गजन्य रोगांवर केले जाणारे संशोधन याबाबत जाणून घेतल्यानंतर अमेरिकी रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्र, पुणे विद्यापीठ एकत्रितरित्या या विषयावर काम करू शकतात. पुणे विद्यापीठासारख्या दर्जेदार विद्यापीठासोबत काम करण्यास अनेक अमेरिकी संस्था, विद्यापीठे उत्सुक आहेत, त्यामुळे अशा संस्थांसोबत पुणे विद्यापीठाने योग्य समन्वय साधावा, असे डेविड जे. रान्झ म्हणाले.

----------------------------

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अमेरिकी विद्यापीठांसोबतचे संबंध आणखीन दृढ व्हावेत या दृष्टीकोनातून आम्ही प्रयत्नशील आहोत. येत्या काळात अमेरिकेतील विद्यापीठासोबत ब्लेंडेड अभ्यासक्रम, लिबरल आर्टस् आणि संयुक्त संशोधन उपक्रम याबाबत जोडले जाण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.

- डॉ. नितीन करमळकर,कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

-------------------------------------

Web Title: Educational Institutions in America Want Friendship of Indian Universities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.