समाजासाठी शिक्षितांनी झटावे

By admin | Published: June 1, 2017 02:03 AM2017-06-01T02:03:33+5:302017-06-01T02:03:33+5:30

पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून धनगर समाजाने प्रगती साधली आहे. समाज अजून प्रगतिशील

The educators fight for the community | समाजासाठी शिक्षितांनी झटावे

समाजासाठी शिक्षितांनी झटावे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून धनगर समाजाने प्रगती साधली आहे. समाज अजून प्रगतिशील कसा होईल, याकडे समाजातील उच्च शिक्षितांनी काम करायला हवे, असे प्रतिपादन महापौर नितीन काळजे यांनी केले.
महापालिकेच्या वतीने येथील मोरवाडी चौकात अहल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती सीमा सावळे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, सहायक पोलीस आयुक्त राम मांडुरके, महिला व बालकल्याण समिती सभापती सुनीता तापकीर, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे, नगरसदस्या आशा धायगुडे-शेंडगे, अनुराधा गोरखे, नगरसदस्य केशव घोळवे, माजी नगरसेवक राजू दुर्गे, सह शहर अभियंता प्रवीण तुपे, कार्यकारी अभियंता ज्ञानदेव जुंधारे, उपअभियंता विजय भोजने, सामजिक कार्यकर्ते लक्ष्मण रूपनर, माणिकराव बारगळ, शोभा मिरजकर, राजन नायर, भुजंगराव दुधाळे, रुक्मिणी धरमे, सोनाताई गडदे, सुरेखा जानकर, आशा काळे, तेजस्विनी दुर्गे, अनिल कोळेकर, राजाभाऊ मस्के, श्रीकांत धनगर, अभिमन्यू गाडेकर उपस्थित होते.
महापौर काळजे म्हणाले, सर्व समाजात शिक्षणाबाबत जनजागृती झाली पाहिजे. त्यासाठी समाजातील उच्च शिक्षित वर्गाने अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम केले पाहिजे.
सावळे म्हणाल्या, अहल्यादेवीचे विचार नागरिकांमध्ये रुजविण्यासाठी आशा धायगुडे- शेडगे यांच्या सारख्यांनी प्रयत्न केल्यामुळे दरवर्षी महोत्सवात नागरिकांचा सहभाग वाढत आहे. पवार म्हणाले, सामाजिक व राजकीय क्षेत्रात अहल्यादेवींच्या विचारांची प्रेरणा घेऊन कार्य करावे.
बुधवारी सकाळी संगीतमय कार्यक्रमांतर्गत पार्श्वगायक रोहित राऊत व योगिता गोडबोले यांनी धनगरी ओव्या गीत संगीताचा कार्यक्रम सादर केला. गजनृत्य प्रमुख अनिल कोळेकर व त्यांचा संच यांनी धनगरी गजनृत्य सादर केले. पिंपरी येथील पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर चौकातील ग्रेडसेपरेटरचे नामकरण महापौर काळजे यांच्या हस्ते झाले. प्रवीण काकडे यांनीही मनोगत व्यक्त केले.

Web Title: The educators fight for the community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.