मुंबई बंदचा एसटी वाहतूकीवर परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 06:21 PM2018-07-25T18:21:54+5:302018-07-25T18:25:41+5:30
मराठा क्रांती माेर्चाच्या वतीने अाज मुंबई बंदची हाक देण्यात अाली हाेती. त्याचा परिणाम मुंबई-पुणे एसटी सेवेवर झाल्याचे दिसून अाले.
पुणे : मराठा क्रांती माेर्चाच्या वतीने अाज मुंबई बंदची हाक दिल्याने त्याचा काहीसा प्ररिणाम एसटी वाहतूकीवर झाल्याचे दिसून अाले. मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अाज कमी असल्याने प्रवाशांच्या संख्येनुसार एसटी बसेस साेडण्यात येत हाेत्या अशी माहिती एसटी विभागाकडून देण्यात अाली. त्याचबराेबर मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या एसटी व शिवनेरी बसेस दुपारपर्यंत बंद हाेत्या. सकाळी 10 वाजेपर्यंत पुणे शहरातील 2 अागार अाणि विभागातील 9 अागारातून एकही बस सुटली नव्हती.
मंगळवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात अाली हाेती. त्याचा परिणाम एसटी वाहतूकीवर झाल्याचे दिसून अाला. अाज पुन्हा मराठा क्रांती माेर्चाच्या वतीने मुंबई बंदची हाक देण्यात अाली हाेती. मुंबईत काही ठिकाणी रास्ता राेकाे अाणि जाळपाेळीच्या घटना घडल्या. त्याचा परिणाम एसटी वाहतूकीवर झाला. पुण्यातील स्वारगेट व शिवाजीनगर एसटी अागारात प्रवासी अडकून पडल्याचे चित्र हाेते. पुण्याहून मुंबईला साेडण्यात येणाऱ्या एसटी व शिवनेरी बसेस या प्रवाशांच्या संख्येनुसार साेडण्यात येत हाेत्या. तर मुंबईवरुन पुण्याकडे येणारी एसटी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली हाेती. त्यामुळे अनेक प्रवासी हे मुंबईत अडकून पडले हाेते. पुणे प्रदेशातील 55 अागरांमधून दरराेज 2155 फेऱ्या हाेत असतात, बुधावारी संध्याकाळपर्यंत त्यापैकी 1543 फेऱ्या हाेऊ शकल्या हाेत्या. तर 46 अागार हे अंशतः बंद हाेते तर 9 अागार हे पूर्णपणे बंद ठेवण्यात अाले हाेते. दरम्यान, पुणे विभागात मंगळवार व बुधवार मिळून एसटीचा सुमारे २० ते २५ लाख रुपयांचा महसूल बुडाल्याचे सांगण्यात आले.