वाहतूककोंडीवर प्रभावी उपाययोजना, पोलीस प्रशासनाचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 10:31 PM2018-11-14T22:31:48+5:302018-11-14T22:35:25+5:30

पोलीस प्रशासनाकडून पुढाकार : बेकायदेशीर वाहनांवर कडक अंमलबजावणी, रस्त्यावरील दुकानदारांना समुपदेश

Effective measures for transporters, initiative of Police administration | वाहतूककोंडीवर प्रभावी उपाययोजना, पोलीस प्रशासनाचा पुढाकार

वाहतूककोंडीवर प्रभावी उपाययोजना, पोलीस प्रशासनाचा पुढाकार

Next

राजगुरुनगर : शहरात होत असलेल्या वाहतूककोंडीवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी पोलीस प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. बुधवारी (दि. १४) राजगुरुनगर नगरपरिषद व पोलीस अधिकारी यांनी कडक अंमलबजावणीसाठी प्रत्यक्ष पाहणीदौरा केला. याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, सहायक पोलीस निरीक्षक संदीप येळे, नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, मुख्याधिकारी मच्छींद्र घोलप आदी उपस्थित होते. यावेळी दुकानदारांनी रस्त्यावर लावलेले फलक जप्त करण्यात आले.

दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर, परतीच्या मार्गावर असलेल्या नोकरदार, प्रवासी यांची पुणे-नाशिक महामार्गावर रविवारपासून मोठी गर्दी झाली आहे. शहारातील रस्त्यांवर मोठ्या संख्येने वाहने पार्किंग केली जातात. त्यामुळे वाहतूककोंडी होते. शहरातील व्यापारी, छोटे दुकानदार त्यांची पार्किंग रस्त्यात व रस्त्याजवळ असते. पर्यायाने वाहतूक सुरळीत राहण्यास अडचण येते. शहरातील वाहतुकीचे वाजलेले तीन-तेरा यामुळे शहरातील नागरिक प्रवास करणारे प्रवासी आणि पोलीस यंत्रणा हैराण झाली आहे. शहरातील अवैध वाहतूक हटवण्यासाठी पोलीस यंत्रणा आता सक्रिय झाली आहे. राजगुरुनगर ही मोठी बाजारपेठ असल्याने जवळपासच्या तालुक्यातील मोठ्या संख्येने ग्राहक सोने, कपडे आदी वस्तू खरेदीसाठी येतात. शहरात अरुंद रस्ते आणि त्यावर ग्राहकांनी केलेली पार्किंग यामुळे शहरातून जाणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास होत आहे. शहरातील रस्त्यांवर वाहने पार्किंग करू नयेत, यासाठी जनजागृती सुरू करण्यात आली आहे.

४रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी वाहने पार्किंग केली जातात. त्यामुळे या दोन्ही महामार्गांवर वाहतूक कोंडी नित्याचीच होत चालली असताना पोलीस उपविभागीय पोलीस आधिकारी गजानन टोम्पे व पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी पोलीस दलाची मोठी फौज घेऊन वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली.
४नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात एकेरी वाहतूक, पार्किंग झोन, फलक लावून तयार करण्यात आले होते; मात्र नगरपरिषदेचे हे नियम दुकानदार व शहरातील नागरिक पायदळी तुडवत होते.
४तरीही नगरपरिषद याकडे दुर्लक्ष करत असताना दिवसभर वाहतूककोंडी होत होती. त्यामुळे त्याचा त्रास प्रत्येक नागरिकाला होत होता.

४मंगळवारी (दि. १३) शहरात होणारी वाहतूककोंडी मोडून काढण्यासाठी पोलीस दल मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याने वाहने रस्त्यात लावलेल्या वाहनचालकांची नागरिकांची धावपळ झाली होती.
४२० ते २५ बेशिस्त वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाला बरोबर घेऊन दुकानदारांचे
समुपदेशन करण्यात आले.

व्यापाºयांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर मात्र, रस्त्यात पार्किंग करणाºया वाहनांवर थेट कारवाई केली जाणार आहे.

पाहणी दौºयातून
समोर आलेला
अ‍ॅक्शन प्लॅन
४वाडा रस्त्यावरील पुरातत्त्व खात्याच्या जागेत त्यांच्या संमतीने व पंचायत समितीमागील खासगी जागेत पार्किंग झोन उभारणे.
४शाळा-महाविद्यालये सुटण्याच्या व भरण्याच्या वेळेत होमगार्ड नेमणूक करणे.
४खासगी कंपन्या बसेससाठी मार्गदर्शक प्रणाली तयार करणे.
४खेड पोलीस ठाण्याने सर्व्हे करून बनविलेला सीसीटीव्ही व पब्लिक आॅडिओ प्रस्ताव नगरपरिषदेने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मंजूर करून घेणे.
४आवश्यक ठिकाणी ‘पे अँड पार्क’ योजना राबविणे.
४फ्लेक्स दुकानदार व होर्र्डिंग मालक यांची संयुक्त बैठक घेऊन अनधिकृत फलकांवर कारवाई केली जाणार आहे.
४आपत्कालीन स्थितीत गल्ली-बोळांतून मार्ग काढण्यासाठी अतिक्रमण हटाव मोहीम राबविणे.
 

Web Title: Effective measures for transporters, initiative of Police administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.