तरुणाईकडून सोशल मीडियाचा प्रभावी वापर

By admin | Published: December 30, 2014 10:51 PM2014-12-30T22:51:24+5:302014-12-30T22:51:24+5:30

डिस्ोंबरच्या शेवटच्या आठवड्यात वेध लागतात ते नववर्ष आणि नववर्षाच्या तयारीचे. बाजारपेठेत नववर्षाच्या निमित्ताने विविध प्रकारच्या भेटवस्तू, शुभेच्छापत्रे यांचे प्रकार पाहवयास मिळतात.

Effective use of social media by the youth | तरुणाईकडून सोशल मीडियाचा प्रभावी वापर

तरुणाईकडून सोशल मीडियाचा प्रभावी वापर

Next

बारामती : डिस्ोंबरच्या शेवटच्या आठवड्यात वेध लागतात ते नववर्ष आणि नववर्षाच्या तयारीचे. बाजारपेठेत नववर्षाच्या निमित्ताने विविध प्रकारच्या भेटवस्तू, शुभेच्छापत्रे यांचे प्रकार पाहवयास मिळतात. मात्र यंदा या बाजारपेठेवर सोशल मिडीयाचा प्रभाव जाणवत आहे. नववर्षाच्या शुभेच्छा देणाऱ्या शुभेच्छा पत्रांची मागणी घटली असल्याचे चित्र आहे.
नववर्षाच्या निमित्ताने शुभेच्छापत्रांची देवाण-घेवाण करणे हा व्यावसायिक आणि नागरिकांचा एक शिरस्ता आहे. मात्र मागील काही वर्षापासून शुभेच्छापत्र देण्यापेक्षा ही व्हाटस्अप, फेसबुक, ट्वीटरच्या माध्यमातुन नववर्षाच्या शुभेच्छा देणेच लोक पसंत करत आहेत. ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी हे दिवस ‘ब्लॅक आॅउट डे’म्हणून ओळखले जातात. असे असतानाही शुभेच्छापत्रांपेक्षाही या सोशल मिडीयावरून संदेशाची देवाण घेवाण सुरूवात झाली आहे.या शुभेच्छापत्रांच्या खरेदीला डिसेंबर अखेरीस सुरूवात होते.मात्र यंदा मागील वर्षाच्या तुलनेत २० ते २५ टक्के घट झाली आहे. वर्षातील व्हेलेंटाईन टे, दिवाळी, ख्रिसमस या बरोबरच नववर्षाच्या निमित्त शुभेच्छापत्र देण्यात येत असतात.मात्र या शुभेच्छापत्रांच्या खरेदीवर सोशल मिडीयाच्या संदेशांमुळे परिणाम झाला आहे. शुभेच्छा पत्रांच्या मागणीत घट झाली आहे. मात्र, शुभेच्छा पत्रांद्वारे थेट नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारा विशिष्ट ग्राहक वर्ग आजही मागणी करीत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. नववर्ष साजऱ्या करण्याच्या पद्धतीमध्ये फरक पडला आहे.तसेच त्याच्या शुभेच्छा देण्यातमध्ये सुद्धा पडलेला आहे.
सोशल मिडीयासोबतच ‘ई-मेल’च्या साहाय्याने नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात येत आहे. २५ ते ५० रूपयांच्या शुभेच्छापत्रांपेक्षा या अ‍ॅप्स मुळे शुभेच्छा देणे अधिक सोपे आणि सुलभ झाले आहे.त्यातच या संदेशाची गहाळ तसेच उशिरा पोहच मिळत नसल्याने ते पाठविणे अधिक सोयीचे ठरत आहे. (वार्ताहर)

४३१ डिसेंबर, १ जानेवारी रोजी मोबाईल मॅसेजसाठी विशिष्ट दर आकारण्यात येणार आहेत. या दोन्ही दिवशी कोणतेही एसएमएस ‘पॅक’ कार्यरत नसणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मंगळवारी (दि. ३०) ‘अ‍ॅडव्हान्स’ एसएमएसद्वारे नुतन वर्षाच्या शुभेच्छा पाठवल्या .
४ नववर्ष साजऱ्या करण्याच्या पद्धतीमध्ये फरक पडला आहे.तसेच त्याच्या शुभेच्छा देण्यातमध्ये सुद्धा पडलेला आहे.
यंदा मागील वर्षी पेक्षा फार कमी प्रमाणात शुभेच्छापत्रांची खरेदी होत आहे.युवा वर्गातुन ही खरेदी कमी झाली आहे.मात्र नोकरदार वर्गातुन आर्वजुन ही शुभेच्छापत्रे विकत घेतली जात आहेत.
-राजेंद्र आहेरकर,
बारामती

 

Web Title: Effective use of social media by the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.