‘आयुर्वेदाला मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सुरू’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 05:03 AM2017-11-06T05:03:16+5:302017-11-06T05:03:16+5:30
आयुर्वेदाचा उज्ज्वल वारसा पारतंत्र्यात नष्ट करण्याचे प्रयत्न झाले. स्वातंत्र्यानंतरही त्याचा फारसा विचार करण्यात आला नाही. आता मात्र आयुर्वेद चिकित्सा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे
पुणे : आयुर्वेदाचा उज्ज्वल वारसा पारतंत्र्यात नष्ट करण्याचे प्रयत्न झाले. स्वातंत्र्यानंतरही त्याचा फारसा विचार करण्यात आला नाही. आता मात्र आयुर्वेद चिकित्सा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी रविवारी सांगितले.
विद्यार्थीमित्र वैद्य एम. व्ही. कोल्हटकर आयुर्वेद प्रतिष्ठानतर्फे ‘त्रिस्कंध आयुर्वेदाचे चिकित्साविषयक पैलू’ या विषयावर पुण्यात आयोजित राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. या वेळी नाईक यांच्या हस्ते कोल्हटकर यांच्यावरील माहितीपटाचे अनावरण तसेच ‘माधवाय स्वाहा’ या गौरवग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी एमआयटी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैद्य दिलीप गाडगीळ आदी व्यासपीठावर उपस्थित होते. आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून आयुर्वेदाला जगभरात नेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. संशोधनाबाबत १० ते १२ देशांशी करार झाले आहेत, अशी माहिती नाईक यांनी या वेळी दिली.