वणवे रोखण्यासाठी ‘रेन ट्री’कडून प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:09 AM2021-03-21T04:09:49+5:302021-03-21T04:09:49+5:30

जागतिक वन दिवस पुणे : जैवविविधतेने नटलेल्या पश्चिम घाटातील जंगले आणि वन्य जीवन वाचवण्यासाठी वणव्यांवर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. ...

Efforts by the Rain Tree to prevent floods | वणवे रोखण्यासाठी ‘रेन ट्री’कडून प्रयत्न

वणवे रोखण्यासाठी ‘रेन ट्री’कडून प्रयत्न

Next

जागतिक वन दिवस

पुणे : जैवविविधतेने नटलेल्या पश्चिम घाटातील जंगले आणि वन्य जीवन वाचवण्यासाठी वणव्यांवर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. याच विचारातून पुण्यातील 'रेनट्री फाऊंडेशन' ही संस्था राजगडाच्या पायथ्याशी वसलेल्या आणि वेल्हे तालुक्यात जंगल परिसंस्थेचे संवर्धन करण्याकरिता गेली ३ वर्षे काम करत आहे. स्थानिक लोकांना आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना वणव्याबाबत उपक्रम घेऊन त्यांना सक्षम करण्यात येत आहे.

वेल्हे तालुक्यात 'बायोलॉजीया' या संस्थेच्या सहकार्याने जैवविविधतेची नोंद केली जात आहे. वेल्हे वनक्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी जागरूकता सत्र, पश्चिम घाटातील पक्षी, अधिवास, पक्ष्यांचे स्थलांतर या विषयांवर माहिती दिली गेली.

रेनट्री फॉउंडेशनने 'वन वणवा व्यवस्थापन' कार्यशाळा घेते. वेल्हे तालुक्यात १.७२ चौरस किलोमीटरचा प्रदेश जंगलाखाली आहे. येथील जंगलांमध्ये नोव्हेंबर ते मे या महिन्यात अधिक प्रमाणात वणवे पेटलेले दिसतात. रेनट्री फाऊंडेशनच्या संस्थापक लीना दांडेकर म्हणाल्या, " ग्रामीण समुदायाचे जीवन आणि उपजीविका संपूर्णपणे जंगलांपासून मिळणाऱ्या परिसंस्था सेवांवर अवलंबून आहे. जैवविविधतेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असणारा पश्चिम घाट वाचवण्यासाठी विविध प्रकल्प राबविले जात आहेत. या सर्व कार्यशाळा लोकांच्या सहभागातून होत आहेत. रेनट्रीच्या शाश्वत भूभाग व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत या कार्यशाळा होत आहेत."

——————————

पश्चिम घाटात पाच हजारपेक्षा जास्त पुष्प वर्गीय वनस्पती, १३९ सस्तन प्राणी, ५०० पक्षांच्या जाती, १८९ उभयचर प्राण्यांच्या जाती आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे या भागात ३२५ दुर्मिळ जातींची नोंद आहे.

———

वेल्हे तालुक्यातील ९ गावांमध्ये स्वयंपाकासाठी जळाऊ लाकूड वापरले जाते. हा वापर थांबवा म्हणून रेनट्री फाऊंडेशनने वेल्हे तालुक्यात बायोगॅस प्रकल्प सुरु केला आहे.

———-

आम्ही लाकूड जाळून चुलीवर कामे करत होतो. आता बायोगॅसमुळे एका बटनावर गॅस सुरु होतो. धूर होत नाही. आमच्यासाठी ही खूप मोठी मदत आहे.

- मनीषा रसाळ, ग्रामस्थ, घावर गाव

—————

या उपक्रमामुळे आमच्या कर्मचाऱ्यांना जंगल आणि इतर परिसंस्थेतील घटकांची शास्त्रीय माहिती मिळाली. जंगल वाचवण्यासाठी नक्कीच उपयोग होईल.

- आशा भोंग, सहाय्यक वन संरक्षक, वन विभाग

————————

वणवा पेटू नये म्हणून...

* जंगलात विडी, सिगारेट ओढून जळकी थोटके टाकू नये

* जंगलात टेंभा न घेऊन जाता बॅटरी किंवा इतर साधने वापरा

* जंगलालगतच्या शेतीमध्ये काडीकचरा जाळू नये

* वणवा लागल्यास स्थानिक वन विभागाशी संपर्क करा

* आसपास लागलेली छोटी आग लगेच विझवा.

Web Title: Efforts by the Rain Tree to prevent floods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.