कोविड केंद्रातील महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रयत्नशील राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:12 AM2021-04-08T04:12:03+5:302021-04-08T04:12:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सध्या राज्यामध्ये कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रूग्णालये, कोविड सेंटरमध्ये रूग्णांची गर्दी ...

Efforts should be made for the safety of women in the Kovid Center | कोविड केंद्रातील महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रयत्नशील राहावे

कोविड केंद्रातील महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रयत्नशील राहावे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : सध्या राज्यामध्ये कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रूग्णालये, कोविड सेंटरमध्ये रूग्णांची गर्दी वाढत आहे. यापार्श्वभूमीवर शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयाने कोविडग्रस्त महिला आणि कोविड केंद्रातील महिलांच्या सुरक्षिततेबाबत जाहीर केलेल्या स्वतंत्र नियमावलीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महिला प्रश्नावर काम करणाऱ्या संघटनांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले आहे.

स्त्री रूग्ण तपासण्यासाठी शक्यतो महिला डॉक्टरनी तपासणी करावी महिला डॉक्टर उपलब्ध नसतील तेथे पुरूष डॉक्टरनी स्त्री रूग्णाची तपासणी करताना स्टाफ नर्स अथवा स्त्री परिचर यांचे उपस्थितीत करावी. स्त्री रूग्णांना स्त्री कक्षात स्वतंत्रपणे वेगळे ठेवावे. रूम मध्ये रूग्ण ठेवताना एका कक्षात दोन अथवा जादा स्त्री रूग्ण ठेवावेत. जेणेकरून त्यांचे मनोबल वाढून सुरक्षिततेची भावना वाढेल. स्त्री रूग्ण कक्षासाठी स्त्री सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी. स्त्री कक्षामध्ये स्वच्छता व इतर कामांसाठी स्त्री स्वच्छता सेवक व स्त्री परिचर यांची व्यवस्था करावी. स्त्री रूग्ण गावाबाहेरील कोवीड सेंटर्समध्ये दाखल न करता शहरातील मध्यवर्ती ठिकाणच्या कोव्हीड सेंटर्समध्ये दाखल करावेत. तसेचस्त्री कक्षामध्ये पुरूष सुरक्षा रक्षक/पुरूष परिचर राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

कोव्हिड सेंटर्ससाठी सीसीटीव्ही व्यवस्था चालू स्थितीत राहील याची काळजी घ्यावी. जेणेकरून येणाऱ्या-जाणऱ्या लोकांच्या हालचालीवर देखरेख करता येईल व जरूरीच्या वेळी सीसीटीव्ही रेकॉर्डिंग उपलब्ध होऊ शकेल. स्त्री रूग्णांना त्यांचे कक्षात मोबाईल फोन वापरण्याची परवानगी द्यावी. स्त्री रूग्ण दाखल असल्यास त्यांचे नातेवाईकांना रूग्णाशी दररोज १-२ वेळा संपर्क साधण्याबद्दल (दूरध्वनीद्वारा) कळवावे. कोणत्याही परिस्थितीत पुरूष डॉक्टरनी एकट्याने स्त्री रूग्णास तपासणी करू नये, अथवा स्त्री कक्षात जाताना व रूग्ण तपासताना स्त्री अधिपरिचारिका/स्त्री परिचर यांचे उपस्थितीतच रूग्णाची तपासणी करावी अशा नियमांचा परिपत्रकात समावेश आहे.

Web Title: Efforts should be made for the safety of women in the Kovid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.