एकात्मिक शेती पद्धतीचे प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:12 AM2021-01-03T04:12:42+5:302021-01-03T04:12:42+5:30
नारायणगाव: शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न वाढीकरिता आणि त्यांना आर्थिक स्थैर्य मिळून देण्यासाठी केंद्रामध्ये किंवा शेतकऱ्यांच्या शेतावर एकात्मिक शेती पद्धतीचे ...
नारायणगाव: शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न वाढीकरिता आणि त्यांना आर्थिक स्थैर्य मिळून देण्यासाठी केंद्रामध्ये किंवा शेतकऱ्यांच्या शेतावर एकात्मिक शेती पद्धतीचे प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन पुणे येथील कृषी तंत्रज्ञान अवलोकन व संशोधन संस्थेचे (अटारी झोन-8) संचालक डॉ. लाखनसिंग यांनी केले.
ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्रामार्फत सन २०२० या वर्षात केलेल्या कामकाजाचा वार्षिक आढावा आणि सन २०२१ या वर्षामध्ये शेतकरी, युवक- युवती आणि कृषी विस्तारक यांच्याकरिता तंत्रज्ञानावर आधारित ठोस वार्षिक कृषी आराखडा बनविण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कृषि विज्ञान केंद्राचे चेअरमन कृषिरत्न अनिल मेहेर, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, कांदा व लसून संशोधन संचलनालयाचे संचालक डॉ. मेजर सिंग, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता (कृषी) व संचालक, शिक्षण डॉ. अशोक फरांदे, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्रज्ञ डॉ. ए. के. उपाध्याय, राष्ट्रीय पुष्पविज्ञानचे शास्रज्ञ डॉ. गणेश कदम, महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत विभागीय संशोधन कार्यालयाचे डॉ. रवींद्र करंडे, प. स. जुन्नरचे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश शेजाळ, माविमच्या अर्चना क्षीरसागर, पाणी फाउंडेशन पुण्याचे ज्ञानेश्वर मोहिते, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रशांत शेटे आदी उपस्थित होते.
अनिल मेहेर यांनी आलेल्या सूचनांचा आढावा घेत शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायदेशीर असणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिके केंद्रामध्ये उभारण्यात येतील, असे आश्वासन दिले.
कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रशांत शेटे यांनी सन २०२० या वर्षाचा प्रगती अहवाल सादर केला. सूत्रसंचालन केंद्राचे कृषी विस्तार शास्त्रज्ञ राहुल घाडगे यांनी, तर स्वागत प्रशांत शेटे यांनी केले.
०२ नारायणगाव
वार्षिक आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना डॉ. लाखनसिंग.