वाळूउपसा करणाऱ्या आठ बोटी फोडल्या
By admin | Published: March 5, 2017 04:11 AM2017-03-05T04:11:48+5:302017-03-05T04:11:48+5:30
नानवीज (ता. दौंड) येथील भीमा नदीपात्रात बेकायदेशीर वाळूउपसा करणाऱ्या ८ बोटी जिलेटीनच्या साह्याने फोडण्यात आल्या. ही कारवाई पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील
दौंड : नानवीज (ता. दौंड) येथील भीमा नदीपात्रात बेकायदेशीर वाळूउपसा करणाऱ्या ८ बोटी जिलेटीनच्या साह्याने फोडण्यात आल्या. ही कारवाई पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल पथक व दौंडचे नायब तहसीलदार सुनील पाटील यांनी संयुक्तरीत्या केली.
नानवीज (ता. दौंड) येथील भीमा नदीपात्रात बेसुमार वाळूउपसा चालू होता. ही माहिती मिळाल्यावरून जिल्हाधिकारी पुणे कार्यालयातील महसूल पथक शनिवारी (दि. ४) सकाळी दौैंड तहसील कार्यालयात दाखल झाले व दौंड तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार धनाजी पाटील, प्रकाश कांबळे, तलाठी सुनील जाधव व इतर महसूल कर्मचारी यांनी सदर कारवाई केली. ही कारवाई करीत असताना अत्यंत गोपनीयता पाळण्यात आली. तर, काही महसूल कर्मचाऱ्यांना तहसील कार्यालयाच्या महसूल कामात गुंतवून ठेवण्यात आले. त्यामुळे येथील वाळूमाफियांना याबाबतची काहीच खबर मिळाली नाही. ही कारवाई जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
दौंड शहर व परिसरालगत वाळू माफियांनी १५-२० दिवसांपासून शासकीय अधिकारी निवडणूक कार्यात गुंतलेले असल्याने भीमा नदीपात्रात मोठा धुमाकूळ घातला होता. (वार्ताहर)