निरोपासाठी अवघे आठ नगरसेवक

By admin | Published: September 16, 2014 12:28 AM2014-09-16T00:28:11+5:302014-09-16T00:28:11+5:30

महापालिकेच्या मावळत्या महापौर चंचला कोद्रे यांना निरोप देण्यासाठी पालिकेत अवघ्या आठ नगरसेवकांनाच वेळ मिळाला,

Eight corporators for Niropa | निरोपासाठी अवघे आठ नगरसेवक

निरोपासाठी अवघे आठ नगरसेवक

Next
पुणो : महापालिकेच्या मावळत्या महापौर चंचला कोद्रे यांना निरोप देण्यासाठी पालिकेत अवघ्या आठ नगरसेवकांनाच वेळ मिळाला, तर नवीन महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या स्वागतासाठीही तेवढेच नगरसेवक उपस्थित होते. त्यामुळे शहराच्या प्रश्नांबाबत उदासीन असलेले नगरसेवक शहराच्या प्रथम नागरिक आणि आपल्यासमवेत काम करणा:या सहका:यांच्या सन्मानार्थही उदासीन असल्याचेच यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर आले.
या प्रकारामुळे नाराज झालेल्या कोद्रे यांनीही खंत व्यक्त करून ‘वर्षभर मुख्य सभा तसेच इतर वेळी  नगरसेवकांच्या भावना आपण ऐकून घेतल्या. मात्र, आपल्या भावना ऐकण्यासाठी कुणीही नाही,’ अशा शब्दांत नाराजीला वाट मोकळी करून दिली.
महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदांसाठीची निवडणूक आज पालिकेच्या श्री छत्रपती शिवाजीमहाराज सभागृहात पार पडली. या निवडणुकीनंतर मावळत्या महापौर आणि नवीन महापौरांच्या स्वागतासाठी सभा सुरू होती. या निवडणुकीसाठी सुमारे 149 नगरसेवक उपस्थित होते. या सभेत 1क् ते 15 नगरसेवकांनी महापौर-उपमहापौरांच्या स्वागतपर भाषण केले. 
मात्र, आपली भाषणो झाल्यानंतर केवळ सभागृह नेते सुभाष जगताप, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे,  मनसेचे गटनेते वसंत मोरे, शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ, माजी महापौर वैशाली बनकर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे, नगरसेविका नंदा लोणकर आणि स्वीकृत नगरसेवक अप्पा रेणुसे हे उपस्थित होते. त्यानंतर सभागृहात माळवत्या महापौर कोद्रे, नवनिर्वाचित महापौर धनकवडे आणि उपमहापौर आबा बागूल यांनी मनोगत व्यक्त केले. मात्र, त्याही वेळी तेवढेच नगरसेवक असल्याने कोद्रे यांनी खंत व्यक्त केली. (प्रतिनिधी)
 
च्आज झालेल्या महापौर-उपमहापौर पदांच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी राष्ट्रवादी कॉँंग्रेस-कॉँग्रेसच्या सुमारे 83 नगरसेवकांनी मतदान केले. तर, त्यातील जवळपास 15 ते 2क् जणांनी या निवडीवर भाषणोही केली. 
च्यांपैकी केवळ सहाच सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक मावळत्या आणि नवीन पदाधिका:यांचे मनोगत ऐकण्यासाठी उपस्थित होते. त्यांत दोन माजी, तर दोन आजी पदाधिका:यांचा समावेश होता. 
च्त्यामुळे किमान सत्ताधारी नगरसेवकांनी तरी आपल्या सदस्यांचा मान राखून उपस्थिती दर्शविली असती, तर काय बिघडले असते, अशी चर्चा महापालिकेत रंगली होती.

 

Web Title: Eight corporators for Niropa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.