महिला पोलिसांना आठ तास ड्यूटी;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:11 AM2021-09-25T04:11:38+5:302021-09-25T04:11:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पोलीस दलातील कामकाज सांभाळून कुटुंबीयांनाही वेळ देता यावा व मानसिक स्वास्थ्य चांगले राहावे या ...

Eight hours duty to female police; | महिला पोलिसांना आठ तास ड्यूटी;

महिला पोलिसांना आठ तास ड्यूटी;

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पोलीस दलातील कामकाज सांभाळून कुटुंबीयांनाही वेळ देता यावा व मानसिक स्वास्थ्य चांगले राहावे या उद्देशाने शहर पोलीस दलातील महिला पोलिसांना येत्या सोमवारपासून (दि. २७) आठ तास ड्यूटी दिली जाणार आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी हा आदेश शुक्रवारी जारी केला. शहरातील एक हजारहून अधिक महिलांना याचा लाभ होईल. जिल्ह्यापाठोपाठ शहरातही या स्वरूपाचा निर्णय झाल्याने महिला पोलिसांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

पोलिसांना आठ तास ड्यूटी देण्याचा प्रयोग काही वर्षांपूर्वी शहर पोलीस दलात करण्यात आला होता. दिवंगत पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांनी संपूर्ण राज्यभरातील पोलिसांसाठी यास्वरूपाचा निर्णय घेतला होता. तथापि, वाढती लोकसंख्या, गुन्हेगारीचे वाढते प्रमाण आणि त्या तुलनेत तोकडी पोलीस संख्या यामुळे हा प्रयोग परिणामकारक राबवणे प्रत्यक्षात शक्य झाले नाही. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दोन महिन्यापूर्वी महिला पोलिसांना आठ तास ड्यूटीचा निर्णय जारी केला. त्याची परिणामकारकता व उपयुक्तता लक्षात घेऊन राज्यभरात या स्वरूपाचा निर्णय घेतला जाईल, असे सूतोवाच पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी केले होते. नागपूरपाठोपाठ पुणे जिल्हा पोलीस दलात या महिन्यापासून या स्वरूपाची योजना राबविण्यात आली. त्यानंतर, शहर पोलीस दलातही या स्वरूपाचा बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

--

Web Title: Eight hours duty to female police;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.