स्थायी समितीच्या सदस्यपदी ८ जणांची निवड

By admin | Published: February 19, 2015 01:09 AM2015-02-19T01:09:41+5:302015-02-19T01:09:41+5:30

महापालिकेच्या स्थायी समितीवर भाजपाचे ३, काँग्रेसचे २, राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसेचा प्रत्येकी १, अशी ८ सदस्यांची निवड करण्यात आली.

Eight members elected as members of Standing Committee | स्थायी समितीच्या सदस्यपदी ८ जणांची निवड

स्थायी समितीच्या सदस्यपदी ८ जणांची निवड

Next

पुणे : महापालिकेच्या स्थायी समितीवर भाजपाचे ३, काँग्रेसचे २, राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसेचा प्रत्येकी १, अशी ८ सदस्यांची निवड करण्यात आली. महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी बुधवारी मुख्यसभेत त्यांची निवड जाहीर केली.
महापालिकेच्या आर्थिक चाव्या स्थायी समितीच्या हाती असल्याने या समितीवरण वर्णी लागण्यासाठी सदस्यांची मोठी धडपड चाललेली असते. त्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे जोरदार प्रयत्न केले जातात. यापार्श्वभूमीवर कार्यकाळ संपलेल्या ८ सदस्यांच्या जागी कोणाची निवड होणार, याची मोठी उत्सुकता लागली होती.
महापौरपदासाठी गेल्या दोन वर्षांपासून इच्छुक असलेल्या अपक्ष नगरसेवक अश्विनी कदम यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून स्थायी समितीच्या सदस्यपदासाठी निवड करण्यात आली आहे. काँग्रसकडून दुसऱ्यांदा नगरसेवक झालेले अविनाश बागवे आणि चंदूशेठ कदम यांना संधी देण्यात आली आहे, तर मनसेकडून आरती बाबर, भाजपाकडून मुक्ता टिळक, श्रीकांत जगताप, राजेंद्र शिळिमकर यांची वर्णी लागली आहे.
शिवसेनेकडून भरत चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्थायी समितीमधील अभय छाजेड, चेतन तुपे, पृथ्वीराज सुतार, कमल व्यवहारे, रवी धंगेकर, मोनिका मोहोळ, हेमंत रासने, योगेश मुळीक यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांच्या जागी या सदस्यांची निवड झाली आहे.

अध्यक्षपदासाठी रस्सीखेच
४स्थायी समितीचे अध्यक्षपद यंदा काँग्रेस पक्षाला मिळणार आहे.
४स्थायीच्या अध्यक्षपदासाठी मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक होणार असली, तरी
काँग्रेसच्या सदस्यांनी आतापासूनच
अध्यक्षपदासाठी फिल्डिंग लावण्यास सुरूवात केली आहे.

Web Title: Eight members elected as members of Standing Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.