कोरेगाव भीमात आठ जागा बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:35 AM2021-01-08T04:35:01+5:302021-01-08T04:35:01+5:30
शिरुर तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीची पंचवार्षीक निवडणूक लागताच तरुण वर्गासह जुन्या मातब्बर पुढा-यांनी कंबर कसायला सुरु केली. ...
शिरुर तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीची पंचवार्षीक निवडणूक लागताच तरुण वर्गासह जुन्या मातब्बर पुढा-यांनी कंबर कसायला सुरु केली. यावर्षी निवडणूक प्रकीया चालू झाल्यापासुन इच्छूक उमेदवारांसह पॅनेल प्रमुखांनी राजकारणाची गणिते आखण्यास सुरुवात केली. यात वार्ड क्रमांक चार व वार्ड क्रमांक दोन मधील ज्येष्ठ लोकांनी एकी दाखवित वार्ड बिनविरोध केला. तर वार्ड क्रमांक तीनमध्ये माघारीच्या दिवशी प्रतिस्पर्ध्यानी एकमेकांना एक-एक जागा देत वार्ड बिनविरोध केला. यात सहापैकी तीन वार्ड बिनविरोध निघल्याने राहिलेल्या तीन वार्डातील नऊ जागांसाठी १९ उमेदवार रिंगनात राहिले आहेत. वार्ड क्रमांक पाच मध्ये दोन जागांवर विरोधी उमेदवारांनी प्रतिस्पर्ध्यास पाठिंबा जाहिर केला आहे. मतदान लागुनही अंतर्गत जुळवाजुळवीची प्रक्रिया सुरु असल्याने सत्ता कोणत्या पॅनेलची येणार याबाबत उत्सुकता आहे. जय मल्हार पॅनेलचे नेतृत्व विठ्ठलराव ढेरंगे, भाऊसाहेब माऊली ढेरंगे, बाळसाहेब फडतरे, अशोक काका गव्हाणे, कैलासराव सोनवणे, अनिल काशिद, विक्रम दौंडकर हे करित आहे. भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलचे नेतृत्व राजाराम ढेरंगे, पी.के गव्हाणे, पंडित ढेरंगे, अमिर इनामदार, रामभाऊ ढेरंगे, गणेश विठ्ठल गव्हाणे हे नेतृत्व करित आहेत.
चौकट : जय मल्हार पॅनेलच्या सात तर भैरवनाथला एक जागा
कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी निवडणूक लागल्यानंतर तीन वार्ड बिनविरोध झाली. यात जय मल्हार पॅनेलचे केशव फडतरे, अनिकेत गव्हाणे, विक्रम गव्हाणे, सविता घावटे, शैला फडतरे, शिल्पा फडतरे, अर्चना सुपेकर तर भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलच्या वंदना गव्हाणे या बिनविरोध निवडून आल्या आहेत.
चौकट : गावकी भावकी जुळल्याने आठ जागा बिनविरोध
कोरेगाव भीमाच्या इतिहासात गावकी भावकी जुळवून घेत लाखो रुपयांचा निवडणूकीतील चुराडा थांबविण्यात ज्येष्ठांसह तरुणांना यश आले आहे. यात प्रामुख्याने गव्हाणे व फडतरे या लोकांनी वर्षानुवर्षाच्या वादावर पडदा टाकित तीन वार्ड बिनविरोध निवडून आणण्यात यश मिळवले.