जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धांसाठी पुणे विद्यापीठाच्या सात खेळाडूंची निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 07:33 PM2018-07-18T19:33:35+5:302018-07-18T19:49:56+5:30
चीनमधील शांघाय येथे हाेणाऱ्या जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सात खेळाडूंची निवड झाली अाहे.
पुणे : चीनमधील शांघाय येथे हाेणाऱ्या जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सात खेळाडूंची निवड झाली अाहे. राेईंग अाणि कनाेयिंग या क्रीडाप्रकारांसाठी पंजाब विद्यापीठाकडून (चंदीगड) गेल्या महिन्यात भारतीय विद्यापीठ संघासाठी निवड अायाेजित करण्यात अाली हाेती.
राेईंगच्या निवड चाचणीकरिता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सार्थक खुळे, मुकेश राजगुरे, तुषार कडाळे, जागृती शहारे अाणि नफिसा सादिक या खेळाडूंची निवड भारतीय संघामध्ये करण्यात अाली अाहे. राेईंगची ही स्पर्धा 10 ते 12 अाॅगस्ट या कालावधीमध्ये शांघायमध्ये हाेणार अाहे. याचबराेबर, कनाेयिंग क्रीडाप्रकारासाठी विद्यापीठाच्या सागर नागरे, सुलतान देशमुख, रविंद्र कडाळे, प्रदीप गाजरे, अमाेल जाधव अाणि सनी साेनवणे या खेळाडूंची निवड चाचणी घेण्यात अाली हाेती. यांपैकी सुलतान देशमुख, सागर नागरे, रविंद्र कडाळे अाणि सनी साेनवणे यांची निवड भरतीय संघामध्य करण्यात अाली अाहे. कनाेयिंगची ही स्पर्धा 10 ते 12 अाॅगस्ट या कालावधीमध्ये स्झाेलाेंक (हंगेरी) येथे हाेणार अाहे. कनाेयिंग व राेईंग या क्रीडाप्रकरांसाठी भारतीय विद्यापीठ संघामद्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अाठ खेळाडूंची निवड इतिहासात प्रथमच झाली अाहे.