आंबेगाव तालुक्यातील १६ नागरिकांकडून आठ हजारांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:11 AM2021-04-13T04:11:14+5:302021-04-13T04:11:14+5:30
आंबेगाव तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत असून वाढणाऱ्या रुग्ण संख्येने प्रशासनाची चिंता वाढली ...
आंबेगाव तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत असून वाढणाऱ्या रुग्ण संख्येने प्रशासनाची चिंता वाढली आहे. शनिवार व रविवार या दोन दिवशी लॉकडाऊन पार पडला. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे त्यात सहभाग घेत काटेकोरपणे बंद पाळला होता. मंचर पोलिसांनी या काळात अनेक गावांमध्ये गस्त घातली. शनिवारी विना मास्क फिरणाऱ्या अकरा जणांवर कारवाई करत साडेपाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. रविवारी ५ विना मास्क फिरणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करत अडीच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मंचर पोलीस ठाणे अंतर्गत विविध गावांमध्ये बहुतेक आस्थापना बंद होत्या.त्यामुळे १८८ प्रमाणे दोन दिवसात एकही गुन्हा दाखल झालेला नाही. सोशल डिस्टंसिंग बाबत गुन्हा दाखल नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. दरम्यान शासनाने जे नियम घालून दिले आहेत. त्याचे पालन नागरिकांनी करावे. नियम न पाळणारा विरुद्ध कारवाई केली जाईल. नागरिकांनी तोंडाला मास्क लावावा, सोशल डिस्टन्सचे पालन करावे, नियम मोडणारा विरुद्ध कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी दिला आहे.