आगार व्यवस्थापकांना आठ हजारांचा दंड
By admin | Published: May 13, 2017 04:57 AM2017-05-13T04:57:31+5:302017-05-13T04:57:31+5:30
तिकीट कागदाचा योग्य वापर न करता कचऱ्यात टाकल्याप्रकरणी स्वारगेट आगार व्यवस्थापकांना पुणे महानगर परिवहन महामंडळाने
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : तिकीट कागदाचा योग्य वापर न करता कचऱ्यात टाकल्याप्रकरणी स्वारगेट आगार व्यवस्थापकांना पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) आठ हजार रुपये दंड ठोठावला आहे. त्यांच्याकडून हा दंड वसूल करून, नोटीस बजावण्यात आल्याचे समजते.
पीएमपीच्या सर्व आगारांमध्ये ई-तिकिटिंगची यंत्रणा कार्यरत आहे. सर्व वाहकांना ई-तिकिटिंगसाठी प्रत्येक आगारातून कागदाचे रोल दिले जातात. एका खासगी संस्थेकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. प्रत्येक तिकिटामागे या संस्थेला पीएमपीकडून ठराविक रक्कम दिली जाते. तिकिटाच्या कागदाच्या रोलच्या वापराची जबाबदारी प्रत्येक आगार व्यवस्थापकांवर आहे.
मात्र, स्वारगेट आगारामध्ये कागदाचे रोल अर्धवट वापरलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यामुळे महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी आगार व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांच्यावर कारवाई करण्याचा आदेश दिला. त्यानुसार गव्हाणे यांच्यावर ८ हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली. तसेच त्यांना नोटीसही बजावण्यात आल्याचे समजते.