शिरुर तालुक्यातील आठ गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:11 AM2021-05-09T04:11:03+5:302021-05-09T04:11:03+5:30
शिक्रापूर व पाबळ परिसरात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत असून येथे अत्यावश्यक वैद्यकीय सेवा वगळता सर्व दुकाने शिक्रापूर येथे १० ...
शिक्रापूर व पाबळ परिसरात मोठ्या प्रमाणात
रुग्णसंख्या वाढत असून येथे अत्यावश्यक
वैद्यकीय सेवा वगळता सर्व दुकाने शिक्रापूर येथे १० मे ते १४ मेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. पाबळ सक्रिय रुग्ण संख्या ७३ असून, याठिकणी १० मे ते २० मे, मांडवगण फराटा येथील रुग्णसंख्या २२ असल्याने १० मे ते १३ मे, आमदाबाद सक्रिय रुग्णसंख्या १२ असल्याने ८ मे ते १५ मे, मलठण व लाखेवाडी ३२ रुग्णसंख्या असल्याने ८ मे ते १७ मे, जांबूत ३७ रुग्णसंख्या १० मे ते १७ मे बंद ठेवण्यात येणार आहे.
या कालावधीत फक्त अत्यावश्यक बाबी म्हणून वैद्यकीय आस्थापना, दूध संकलन केंद्र सकाळी ७ ते सकाळी ९ या वेळेत सुरू रहातील, बँका व खताची दुकाने चालू राहतील. या काळात शेतीविषयक सर्व कामे सामाजिक अंतराचे निकष पाळून सुरू राहतील, असेही प्रांताधिकारी संतोष कुमार देशमुख यांनी दिलेल्या आदेशात म्हटले असल्याचे तहसीलदार लैला शेख यांनी सांगितले आहे.