ट्रकच्या धडकेत आठ वर्षाच्या बालकसह वडिलांचा मृत्यू; पाबळ - शिरूर रस्त्यावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 06:34 PM2023-08-01T18:34:28+5:302023-08-01T18:35:00+5:30

ट्रकचे चाक दोघांच्या अंगावरून गेल्याने दुर्दैवी मृत्यू, तर पत्नी गंभीर जखमी

Eight-year-old boy and father killed in truck collision; Pabal - Shirur road incident | ट्रकच्या धडकेत आठ वर्षाच्या बालकसह वडिलांचा मृत्यू; पाबळ - शिरूर रस्त्यावरील घटना

ट्रकच्या धडकेत आठ वर्षाच्या बालकसह वडिलांचा मृत्यू; पाबळ - शिरूर रस्त्यावरील घटना

googlenewsNext

शिक्रापूर : पाबळ शिरूर रस्त्यावर खैरेनगर जवळ ट्रक चालकाची धडक दुचाकीहून चाललेल्या दाम्पत्याला बसून भाऊसाहेब काळूराम चौधरी व अश्विन भाऊसाहेब चौधरी या बापलेकांचा जागीच मृत्यू झाला. तर अनिता भाऊसाहेब चौधरी गंभीर जखमी झाल्या आहेत. याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अमोल सुदाम कदम या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 शिरूर खैरेनगर पाबळ रस्त्याने भाऊसाहेब चौधरी रात्रीच्या सुमारास या दुचाकीहून पत्नी व मुलासह जात होते. हॉटेल बैठक समोर पाठीमागून आलेल्या ट्रकची चौधरी यांना जोरदार धडक बासल्याने भाऊसाहेब व मुलगा अश्विन रस्त्यावर पडले. आणि त्यांची पत्नी अनिता रस्त्याचे बाजूला पडली. यावेळी ट्रकचे चाक भाऊसाहेब व अश्विन यांच्या अंगावरून गेल्याने ते जागीच ठार झाले. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह शवविच्छेदन साठी पाठवून देऊन जखमी महिलेला उपचारासाठी हलवले. यावेळी पोलिसांनी चालकाची चौकशी केली असता तो दारु पिल्याचे निदर्शनास आले. 

अपघातात भाऊसाहेब काळूराम चौधरी (वय ४३ वर्षे) व अश्विन भाऊसाहेब चौधरी (वय ८ वर्षे दोघे रा. खैरेनगर ता. शिरुर जि. पुणे) या दोघांचा जागीच मृत्यू होऊन अनिता भाऊसाहेब चौधरी (वय ३५ वर्षे रा. खैरेनगर ता. शिरुर जि. पुणे) या गंभीर जखमी झाल्या आहेत. घटनेबाबत गणेश शंकर चौधरी (वय ५३ वर्षे रा. रा. खैरेनगर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी अमोल सुदाम कदम (वय ३० वर्षे रा. चांडोली ता. खेड जि. पुणे) या ट्रक चालकावर सदोश मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.  पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार हे करत आहे.

Web Title: Eight-year-old boy and father killed in truck collision; Pabal - Shirur road incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.