अठराशे रिक्षाचालकांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:10 AM2021-05-21T04:10:32+5:302021-05-21T04:10:32+5:30
बारामती : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने निर्बंध घातले आहेत. त्या अनुषंगाने शासनाने राज्यातील रिक्षा परवानाधारकांना ...
बारामती : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने निर्बंध घातले आहेत. त्या अनुषंगाने शासनाने राज्यातील रिक्षा परवानाधारकांना प्रत्येकी १ हजार ५०० रुपये प्रमाणे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. बारामती येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील संगणकीय अभिलेखानुसार वाहन ४.० या प्रणालीवर जवळपास १ हजार ८०९ नोंदणीकृत रिक्षा परवानाधारक आहेत.
प्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील रिक्षा परवानाधारकांना शासनाच्या सानुग्रह अनुदानाचा लाभ घेता येणार आहे. संबंधितांच्या बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने रक्कम जमा करण्याबाबतची माहिती परिवहन विभागाच्या या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. याकरिता रिक्षा परवानाधारकांनी त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडणे आवश्यक आहे. सर्व रिक्षा परवानाधारकांनी त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी तत्काळ जोडणी करून घ्यावे, जेणेकरून सानुग्रह अनुदानाची रक्कम त्यांना वेळेवर अदा करता येईल. त्याचप्रमाणे सदर प्रणाली तयार झाल्यानंतर उपरोक्त संकेतस्थळावर त्याची माहिती प्रदर्शित करण्यात येईल, जेणेकरून सर्व रिक्षा बांधवांना त्याचा फायदा घेणे शक्य होईल, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे.