ejuri news जेजुरीतील माघ पोर्णिमा यात्रा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:18 AM2021-02-23T04:18:55+5:302021-02-23T04:18:55+5:30
माघपोर्णिमा यात्रा तसेच ऐतिहासिक चिंचेच्या बागे संदर्भात चर्चा करण्यासाठी सोमवार दि.२२ रोजी ऐतिहासिक छत्री मंदिर आवारात खंडोबा देवाचे मानकरी,पालखी ...
माघपोर्णिमा यात्रा तसेच ऐतिहासिक चिंचेच्या बागे संदर्भात चर्चा करण्यासाठी सोमवार दि.२२ रोजी ऐतिहासिक छत्री मंदिर आवारात खंडोबा देवाचे मानकरी,पालखी सोहळ्याचे खांदेकरी,ग्रामस्थ आणि श्री मार्तंड देवसंस्थानचे विश्वस्त यांची संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी कोरोनाचे संकट पुन्हा वाढल्याने हि यात्रा रद्द करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ रत्नपारखी, श्री खंडोबा पालखी सोहळा समितीचे पदाधिकारी व राजेंद्र पेशवे, विश्वस्त संदीप जगताप,शिवराज झगडे,माजी विश्वस्त सुधीर गोडसे, सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ रत्नपारखी, माजी नगरसेवक हेमंत सोनवणे ,अनिल झगडे,संतोष खोमणे, यांनी चिंचेच्या बागेविषयी प्रश्न मांडले. यावेळी पालखी सोहळा समितीचे अरुण खोमणे,बबन बयास,पंडित हरपळे, ,रामदास माळवदकर,सुशील राउत, व मोठ्या संख्येने जेजुरीकर ग्रामस्थ उपस्थित होते.
जेजुरीच्या ऐतिहासिक छत्री मंदिर आवारात जेजुरीकर ग्रामस्थांची बैठक संपन्न झाली.